मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाच्या खासगीकरणाला कामगारांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

वडाळा - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव व मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. अण्णा दुराई यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध वडाळा येथील पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी तीव्र निदर्शने केली. या वेळी मोठ्या संख्येने डॉक्‍टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.

कामगार संघटनांशी बोलणी करून पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाचा विकास करावा, कामगारांच्या अस्तित्वात असलेल्या सेवा शर्ती आहे तशाच चालू राहिल्या पाहिजेत. त्यात कोणताही बदल करू नये; अन्यथा कामगार खासगीकरणाला तीव्र विरोध करतील, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी दिला. ‘सार्वजनिक-खासगी सहभागांतर्गत ६१ लाख खर्च करून नेमणूक केलेल्या सल्लागाराने बनवलेला अहवाल विश्वस्तांच्या बैठकीत ठेवण्यात यावा. त्यावर सखोल चर्चा होऊन कामगारांच्या सेवा शर्तीचे रक्षण झाले, तरच रुग्णालयाच्या विकासाला कामगार मान्यता देतील; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक ॲण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनचे व मुंबई पोर्ट ट्रस्ट विश्वस्त सुधाकर अपराज यांनी सांगितले. या वेळी ट्रान्सपोर्ट ॲण्ड डॉक वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष केरसी पारेख, मारुती विश्वासराव, विजय रणदिवे, लहू कोकणे आदी उपस्थित होते.

Web Title: Mumbai Port Trust Hospital workers protest privatization