मुंबई: रूग्णवाढीचा दर आता एक टक्क्यापर्यंत खाली, पण...

मुंबई: रूग्णवाढीचा दर आता एक टक्क्यापर्यंत खाली, पण... मुंबईतील कोरोना संसर्गाची स्थिती आटोक्यात आली असली तर एक चिंतेची बाब आहे. Mumbai Positivity Rate down to 1 percent but Death Rate still above 3 which is point of concern
corona
coronasakal media

मुंबईतील कोरोना संसर्गाची स्थिती आटोक्यात आली असली तर एक चिंतेची बाब आहे.

मुंबई: शहरात गेल्या २४ तासांत 32,894 चाचण्या (Covid Tests) करण्यात आल्या. त्यापैकी 331 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह (Positive Reports) आले. त्यामुळे मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट (Positivity Rate) हा आता एका टक्क्यापर्यंत खाली आला. पण असे असले तरी मृत्यूदर (Death Rate) मात्र 3.2 टक्के इतका असल्याने ही थोडीशी चिंतेची (Concern) बाब आहे. मुंबईत कोरोना आता पूर्णपणे आटोक्यात (In Control) आला असून 23 वॉर्डमधील रुग्ण दुपटीचा कालावधी एक हजार दिवसांपार गेला आहे. मुंबईतील एकूण रूग्णदुपटीचा कालावधी (Doubling Rate) 1,458 दिवसांवर पोहोचला आहे.

corona
मुंबई विमानतळावरील 'अदानी एअरपोर्ट्स'चे बोर्ड शिवसैनिकांनी फोडले

मुंबईत सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी 'बी' प्रभाग सँडहर्स्ट रोडमध्ये 3,809 दिवस झाला आहे तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी 'डी' प्रभाग कुलाबा-फोर्ट 982 दिवस आहे. यामध्ये वाईट परिस्थिती असलेली उत्तर मुंबईची स्थितीही आता सुधारली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असताना मुंबईतील कोरोना स्थिती सुधारल्याने दिलासा मिळाला आहे.

corona
'आमचा सी.एम जगात भारी', मनसेने मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य

मुंबईचा रूग्णवाढीचा दर कमी होत असला तरी मृत्युदर मात्र 3 %च्या वर आहे. रविवारी दिवसभरात 10 मृत्यूंची नोंद झाली असून मृत्युदर 3.2 % नोंदवला गेला. बाधित रुग्णांसह मुंबईतील मृतांचा आकडा ही गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी झाल्याचा दिसतो. मात्र असे असले तरी आताचा मृत्युदर जगातील, देश व संपूर्ण राज्यातील मृत्यूदराच्या तुलनेत अधिक आहे. जागतिक मृत्युदर 2.14%, देशाचा 1.34% तर राज्याचा मृत्युदर 2.11% आहे.

corona
"बरोबर ना राऊतसाहेब?"; 'त्या' ट्वीटवरून राणेंचा शिवसेनेला खोचक टोला

मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 97 % आहे. तर कोविड रुग्णवाढीचा दर 0.05 % पर्यंत खाली आला आहे. मुंबईत दररोज 30 ते 35 हजार कोरोना चाचण्या केल्या जातात. प्रत्यक्ष रुग्णसंख्या कमी असून बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीचे संपर्क वाढत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत 1,953 अति जोखमीचे संपर्क आढळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com