मुंबईतील खड्ड्यांमुळे न्यायमूर्तींना पाठदुखी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

मुंबई - मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सारेच हैराण आहेत. महापालिकेला न दिसलेले खड्डे दाखवण्यासाठी "सकाळ‘ने राबवलेल्या अनोख्या मोहिमेतून प्रशासन खडबडून जागे झाले. अजूनही अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी यांच्यातील हद्दीच्या वादात अनेक खड्डे आजही मोकळा श्‍वास घेत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांचा श्‍वास मात्र यामुळे रोखला जात आहे. खुद्द उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही या खड्ड्यांचा त्रास झाला. खड्ड्यांमुळे आपल्याला पाठदुखी झाल्याचे न्यायमूर्तींनी भर न्यायालयात सांगितले आणि सारेच अवाक झाले. 

पावसाचा अचूक अंदाज करण्याबाबत अत्याधुनिक वेधशाळा, डॉप्लर रडार आदीं संदर्भात सादर झालेल्या जनहित याचिकेची मंगळवारी न्या. विद्यासागर कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्यासमोर झाली. त्या वेळी पावसावरून खड्ड्यांचा विषय निघाला. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर नियमित खड्डे पडतात, अशी चर्चा सुरू झाल्यावर न्यायमूर्ती कानडे यांनी त्याचा अनुभव सांगितला. खड्डे पडलेल्या रस्त्यावरून प्रवास केल्याने पाठदुखी आपल्या मागे लागली, असे सांगून मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असे कंत्राटदारांकडून लिहून घेण्याची व्यवस्था होईल का, असेही न्यायमूर्तींनी विचारले. 

सरकारी यंत्रणांत समन्वय नाही? 

महापालिकेची नेहमी बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अनिल साखरे दुसऱ्या एका प्रकरणासाठी या वेळी न्यायालयात आले होते. "हा काय प्रकार आहे, हे काय चालले आहे‘, असे न्या. कानडे यांनी त्यांना विचारले. त्यावर वांद्रे व सायन येथून सुरू होणारे द्रुतगती महामार्ग आमच्या हद्दीत येत नाहीत, ते "पीडब्ल्यूडी‘च्या हद्दीत येतात, असे साखरे या वेळी म्हणाले. त्यावर तुम्हा दोन सरकारी यंत्रणांचा समन्वय नाही का, असा सवाल करत हे प्रकरण आम्ही ऐकून खड्ड्यांबाबत महापालिकेला, कंत्राटदारांना काही आदेश देऊ का, असे न्यायालयाने विचारले. त्यावर याबाबत दुसऱ्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी सुरू असल्याचे साखरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खंडपीठाने काहीही आदेश दिला नाही.

Web Title: Mumbai potholes Justice backpen!