Mumbai : डोंबिवलीतील वाहन पार्कींगचा तिढा सुटणार ? पाटकर प्लाझा वाहनतळाला मुहूर्त मिळणार...

डोंबिवली पूर्वेतील चिमणीगल्ली येथे खासगी विकासकाकडून पाच सहा वर्षापूर्वी पाटकर प्लाझा ही पाच मजली इमारत बांधण्यात आली. टिडीआरच्या माध्यमातून बांधलेल्या या इमारतीत तळ मजला आणि पहिला मजल्यावर तीन ते चार हजार चौरस फुटांचे वाहनतळ आहे.
mumbai
mumbaisakal

डोंबिवली - शहरात वाहनांची संख्या वाढत असून मुख्य चौकांत त्यामुळे वाहन कोंडीची समस्या कायम उद्भवते. डोंबिवली पूर्वेतील बाजी प्रभू चौक, इंदिरा चौक हा शहरात मध्यवर्ती भाग असून मार्केटचा हा केंद्रबिंदू असून येथे रिक्षा थांबा, केडीएमटी थांबा असल्याने हा वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट झाला आहे. या ठिकाणची कोंडी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने पाच सहा वर्षापूर्वी पाटकर प्लाझा इमारतीत वाहनतळ उभारले.

मात्र वापराविना ते तसेच धूळखात पडून होते. अखेर हे वाहनतळ सुरु करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरु केल्या आहेत. या वाहनतळाची निविदा प्रक्रीया जाहीर करण्यात आली आहे. या निविदा प्रक्रीयेला प्रतिसाद मिळाल्यास वाहनतळ सुरु होऊन वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

mumbai
Mumbai : ... उद्घाटनासाठी तीन तास उशिरा पोहचले मंत्री केसरकर; एसटीचे अधिकारी, कर्मचारी खोळंबले

डोंबिवली पूर्वेतील चिमणीगल्ली येथे खासगी विकासकाकडून पाच सहा वर्षापूर्वी पाटकर प्लाझा ही पाच मजली इमारत बांधण्यात आली. टिडीआरच्या माध्यमातून बांधलेल्या या इमारतीत तळ मजला आणि पहिला मजल्यावर तीन ते चार हजार चौरस फुटांचे वाहनतळ आहे. या वाहनतळात सुमारे 300 दुचाकी व 50 चारचाकी वाहने उभी राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाच्या ताब्यात ही इमारत येऊन सुद्धा या इमारतीतील वाहनतळ सुरु करण्यास मात्र पालिकेला मुहूर्त मिळत नव्हता.

सुरुवातीला पालिकेने तीन वेळा वाहन तळाची निविदा प्रक्रीया काढली. परंतू त्याला एकदाही प्रतिसाद न मिळाल्याने हे वाहन तळ सुरु होऊ शकले नाही. उपप्रादेशिक परिवहन अधिकरी, वाहतूक अधिकारी यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवरील रिक्षा वाहनतळ बंद करुन ते पाटकर प्लाझा मधील वाहनतळ जागेत सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

mumbai
Mumbai : एसटीचे कर्मचारी ताटकळत उभे होते अन् मंत्री दीपक केसरकर रात्री ९ वाजता उद्घाटनाला पोहचले

वाहनतळांवर सुमारे 250 हून अधिक रिक्षा एकावेळी प्रवासी वाहतूक करतील असा आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार केला होता. या वाहनतळाच्या माध्यमातून केळकर रस्ता, पाटकर रस्ता, फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, नेहरु रस्ता भागातील रिक्षा एकाच ठिकाणी उभ्या करण्याचे नियोजन होते. मात्र त्यावर पुढे काही हालचाली झाल्या नाहीत.

काही राजकीय अडथळे निर्माण झाल्याने हे वाहनतळ असेच धूळ खात पडून होते. अखेर हे वाहनतळ सुरु करण्यासाठी पालिका प्रशासनाने मागील वर्षापासून प्रयत्न सुरु केले. गेल्यावर्षी हे वाहनतळ भाडेपट्ट्याने देण्यासाठी निविदा प्रक्रीया काढण्यात आली. त्यावेळी ठेकेदाराने अनामत रक्केमचा भरणा न केल्याने ही निविदा प्रक्रीया रद्द झाली होती. यंदा पुन्हा एकदा निविदा प्रक्रीया राबविण्यात आली असून यावर्षी त्याला कसा प्रतिसाद मिळतो पाहू असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

mumbai
Mumbai : ... उद्घाटनासाठी तीन तास उशिरा पोहचले मंत्री केसरकर; एसटीचे अधिकारी, कर्मचारी खोळंबले

- डोंबिवलीतील वाहन पार्कींग चा तिढा सुटावा यासाठी पालिका प्रशासनाने पूर्वेला सूनील नगर व पश्चिमेला सम्राट चौकात आरक्षित भूखंडावर वाहनतळ उभारले आहे. परंतू स्टेशनपासून ते दूर अंतरावर असल्याने स्टेशन परिसरातील वाहन चालकांना त्याचा उपयोग होत नाही.

- मानपाडा रोड, फडके रोड, नेहरु मैदान, रथ रोड, रामनगर येथील रोड, नेहरु रोड, आगरकर रोड येथे रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी असतात. या वाहनचालकांना वाहन उभे करण्यासाठी सुविधा प्राप्त होईल.

डोंबिवलीतील पाटकर प्लाझा इमारतीमधील वाहनतळ सुरू करण्याच्या दृष्टीने ठेकेदार नियुक्तीसाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. प्रतिसाद मिळेल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल. डोंबिवली पूर्व भागातील रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांना वाहनतळ येथे यामुळे जागा उपलब्ध होईल.

- वंदना गुळवे, उपायुक्त, मालमत्ता विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com