मुंबई-पुणे हायवेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळ्याने वाहतुक कोंडी

जुन्या अमृतांजन पुलाच्या मागील बाजुपर्यंत वाहतुक खोळंबली आहे
tunnel
tunnelgoogle
Summary

जुन्या अमृतांजन पुलाच्या मागील बाजुपर्यंत वाहतुक खोळंबली आहे

मुंबई - मुंबई - पुणे महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाताना लागणाऱ्या आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. जुन्या अमृतांजन पुलाच्या मागील बाजुपर्यंत ही वाहतुक खोळंबली असून मागील अर्ध्या तासाहून अधिक वेळ नागरिक वाहनांमध्ये अडकले आहेत. (adoshi tunnel) या परिसरात ट्राफीक जाम झाले असून नागरिक वैतागले आहेत. दरम्यान, या प्रदेशात पावसाचे वातावरण झाले आहे.

tunnel
पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा - निलेश राणे

बऱ्याच वेळा अनेक कारणाने या बोगद्यातील वाहतूकीला अडचणी येत असतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. घटनास्थळावरून दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. सातत्याने पडत असलेल्या पाऊस किंवा वाऱ्यामुळे आडोशी बोगद्यावजळच्या डोंगराचा काही भाग सरकून महामार्गावर आला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आयआरबी तसेच अन्य सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. मार्गावरील दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. यासाठी मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

tunnel
सदावर्तेंच्या भाषणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com