पुणे-मुंबईकरांसाठी खूशखबर ! 'या'  तारखेपासून मुंबई-पुणे रेल्वे मार्ग पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

गेल्या दहा दिवसापासून मुंबई- पुणे रेल्वे सेवा ठप्प असून येत्या 16 ऑगस्टपासून पुन्हा रेल्वे मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबई- पुणे या मार्गावर दरड कोसळणे आणि काही ठिकाणी रुळाखालील वाळू वाहून गेल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द तर बहुतांश गाड्यांचे मार्ग बदलले असून येथील कामे तातडीने पूर्ण करण्यात येत आहे. मंगळवारी त्याचा आढावा मध्य रेल्वे अधिकाºयांनी घेतला.

मुंबई : गेल्या दहा दिवसापासून मुंबई- पुणे रेल्वे सेवा ठप्प असून येत्या 16 ऑगस्टपासून पुन्हा रेल्वे मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबई- पुणे या मार्गावर दरड कोसळणे आणि काही ठिकाणी रुळाखालील वाळू वाहून गेल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द तर बहुतांश गाड्यांचे मार्ग बदलले असून येथील कामे तातडीने पूर्ण करण्यात येत आहे. मंगळवारी त्याचा आढावा मध्य रेल्वे अधिकाºयांनी घेतला.

मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या दरडींचा ढिगारा आणि रूळ दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असल्याने येत्या शुक्रवारी मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. सतत पडणाऱ्या संतधार पावसामुळे मुंबई- पुणेतील घाट भागात सतत दरडी कोसळत आहे. यामुळे या भागात दरड हटवण्याच्या कामात कर्मचार्यांना अडथळे निर्माण होत आहे. याकामासाठी एकूण 250 हुन अधिक कर्मचारी कामे करत आहे. यासाठी मंगळवारी दरड कोसळलेल्या कर्जत ते लोणावळा भागांचा मध्य रेल्वे महाव्यवस्थापक ए.के.गुप्ता आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा घेतला.

दोन दिवसांपूर्वीही याच भागात होत असलेल्या कामांची माहिती घेतली होती. दरड कोसळत असलेल्या ठिकाणी रेल्वेकडून संरक्षक भिंत, जाळ्या यासह अनेक उपाययोजना केल्या. तर सिग्नल यंत्रणा, रुळ आणि ओव्हरहेड वायरचीही कामे केली जात आहेत. ही कामे मोठ्या प्रमाणात हाती घेताना त्याला गती दिली जात आहे. हवामान सुस्थितीत राहिल्यास मुंबई-पुणे घाट मार्गावरील रेल्वे वाहतूक 16 ऑगस्टपासून  पूर्ववत करण्याचे प्रयत्न आहे असे  मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Pune Railway Starts from 16 augast