
Mumbai : रेल्वे सुरक्षा दलाने १६ प्रवाशांचे प्राण वाचवले! पोलिसांच्या 'मिशन जीवन रक्षक"ची कामगिरी
मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठीही नेहमीच आघाडीवर असतात. मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी "मिशन जीवन रक्षक" अंतर्गत गेल्या महिन्याभरात मध्य रेल्वेवर स्वतःचा जीव धोक्यात घालून १६ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.
मध्य रेल्वेचा सुरक्षा दलाचे जवान केवळ रेल्वेच्या मालमत्तेचेच रक्षण करण्यासाठीच नव्हे तर कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठीही नेहमीच आघाडीवर असतात आणि चोवीस तास जागरुक असतात.
मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी "मिशन जीवन रक्षक" चा एक भाग म्हणून मे महिन्यात अशा १६ प्रवाशांना मध्य रेल्वेवर वाचवण्यात आले आहे. या जीव वाचवणाऱ्या घटनांचे काही व्हिज्युअल प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुंबई विभाग - ३
भुसावळ विभाग - ६
नागपूर विभाग - ६
सोलापूर विभाग - १
प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष
रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका आणि ट्रेन तसेच रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. आरपीएफ जवानाचे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर बारीक लक्ष ठेवतात.