मुंबई: लोकल थांबवून एक्‍सप्रेस गाड्या सोडल्याने प्रवाशांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई - मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल थांबवून मेल-एक्‍स्प्रेस गाड्या आगोदर सोडल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन सुरु केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर कल्याण-कसारा आणि कसारा-कल्याण या दोन्ही अप, डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे.

मध्यरात्री साडेतीन ते साडे पाच वाजेपर्यंत खडवली टिटवाळा दरम्यान ओव्हरहेड दुरुस्तीसाठी रोजच्याप्रमाणे शट डाऊन घेण्यात आला. मात्र तो साडेपाच वाजेपर्यंत चालल्याने मुंबईकडे जाणारी पहाटे 5.25 ची लोकल काहीशी उशिरा आली. त्यात भरीस भर म्हणजे ही लोकल थांबवून मुंबईकडे जाणाऱ्या मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्या सोडण्यात आला. अनेक वेळा अशाच प्रकारे बाहेरगावच्या गाड्या सोडण्यात येत असल्याने कामावर जाण्यास लेटमार्क लागत असल्याने प्रवाशांमध्ये आधीच नाराजी।होती. आज पुन्हा तोच प्रकार घडल्याने संतापाचा कडेलोट झालेले प्रवासी थेट रुळावर उतरले आणि त्यांनी।मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी दोन्हीकडील वाहतूक रोखून धरली आहे. गेल्या 2 तासांपासून प्रवाशांचे हे उत्स्फूर्त आंदोलन सुरू असल्याने अनेक गाड्या रखडल्या आहेत. तर हळूहळू प्रवाशांची गर्दी वाढत जात असून प्रवसी कमालीचे संतप्त झाले आहेत.

दरम्यान कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नसून प्रवाशांनी सहकार्य करावे आणि आंदोलन मागे घेऊन रेल्वे वाहतूक सुरु करावी असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले आहे.

Web Title: Mumbai Railway transport distrubed