Police Bharti : 'भावी' पोलिसांची मैदानी चाचणी पुढे ढकलली; अवकाळीचा फटका

मुंबईसह ठाण्यातल्या काही भागांमध्ये रात्रीपासून पाऊस सुरुच आहे.
Mumbai Police Bharti
Mumbai Police BhartiSakal

मुंबईला आज सकाळी अवकाळी पावसाचा फटका बसला. काल रात्रीपासूनच मुंबईसह ठाण्याच्या काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. सकाळी पावसाचा जोर वाढला. याचाच फटका पोलीस भरतीलाही बसला आहे.

मुंबईत झालेल्या या अवकाळी पावसामुळे मुंबई पोलीस भरतीवर परिणाम झाला आहे. मैदानात पाणी साचल्याने आजची मैदानी चाचणी पुढे ढकलली आहे. नायगाव इथे आज होणारी मैदानी चाचणी शनिवारी तर मरोळ आणि कलिना इथं सोमवारी मैदानी चाचणी होईल.

Mumbai Police Bharti
Mumbai Rain : अरे काय चाललंय? मुंबईत धो-धो पाऊस; रात्रीपासून धुमाकूळ सुरुच

उद्या होणाऱ्या मैदानी चाचणीबद्दल मात्र संभ्रम कायम आहे. त्याबद्दल काही वेळात निर्णय होण्याची शक्यता आहे. मैदान सुकल्यास या चाचण्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील. अन्यथा यामध्ये होणारे बदल काही वेळात कळवण्यात येतील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com