मुंबईतल्या पावसाचा फटका वाहतुकीवर, रेल्वे सेवा विस्कळीत

पूजा विचारे
Wednesday, 23 September 2020

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवा तसंच वाहतुकीवर झाला आहे. 

मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवा तसंच वाहतुकीवर झाला आहे. 

रेल्वे सेवा विस्कळीत 

चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत. जयपूर- मुंबई सेन्ट्रल ही  एक्सप्रेस गाडी बोरीवली स्टेशनवर थांबवण्यात आली. विरार पासून डहाणू स्टेशनपर्यंत फास्ट ट्रकवर पहिली लोकल 7.50 ला रवाना झाली. 

या मार्गावर पाणी साचलं

ग्रांट रोड ते चर्नी रोड
लोअर परळ ते प्रभादेवी
महालक्ष्मी ते मुंबई सेंट्रल
दादर ते मांटुगा
माटुंगा ते माहिम
 
 
मध्ये रेल्वे मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली. मध्य रेल्वे स्थानकातील सायन, परळ स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं रेल्वे वाहतूक रद्द केली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेनं याबाबत माहिती दिली आहे. 

वाहतुकीच्या मार्गात बदल

उड्डाणपुलमार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी
भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट
सायन मेन रोडमार्गे सायन रोड २४
मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम)
लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार
भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव
जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे

Mumbai rains disrupt traffic suspended train services


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai rains disrupt traffic suspended train services