MumbaiRains : महालक्ष्मी एक्स्प्रेस खोळंबली; हजारो प्रवासी अडकले (व्हिडिओ)

गिरीष त्रिवेदी
शनिवार, 27 जुलै 2019

रुळाच्या दोन्ही बाजूला महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने गाडीत अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीती वाढत आहे. या गाडीमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. एनडीआरएफची तुकडी लवकरच घटनास्थळी दाखल होत आहे. 

बदलापूर : शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, बदलापूर-वांगणी दरम्यान गोरेगावजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. या गाडीतील हजारो प्रवाशी अडकून पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रुळाच्या दोन्ही बाजूला महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने गाडीत अडकलेल्या प्रवाशांमध्ये भीती वाढत आहे. या गाडीमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. एनडीआरएफची तुकडी लवकरच घटनास्थळी दाखल होत आहे. कर्जत आणि वांगणी येथे ट्रॅक वर सचल्यामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या कल्याण इथेपर्यंतच धावणार आहेत.

उल्हास नदीला पूर आल्याने वांगणीजवळ रेल्वे रुळावर पाणी आले. त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस तेथेच अडकून पडली. आता सध्याही रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी असून, फक्त अर्धा फूट आणखी पाणी वाढल्यास रेल्वेत पाणी घुसण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Rains Mahalaxmi Express Held up With Around 2000 Passengers