Mumbai Rains : आमचं स्पिरीट घाला चुलीत... 

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जुलै 2019

मुंबईत काहीही झालं तरी आमची मुंबई कधीच थांबत नाही.. आमच्या मुंबईचं स्पिरीटच असलं आहे की समोर कोणतंही संकट आलं तरी आम्ही निधड्या छातीनं त्याला समोरं जातो.. 

मुंबई : मुंबईत काहीही झालं तरी आमची मुंबई कधीच थांबत नाही.. आमच्या मुंबईचं स्पिरीटच असलं आहे की समोर कोणतंही संकट आलं तरी आम्ही निधड्या छातीनं त्याला समोरं जातो.. 

अरे हट....!

काल रात्री निघालोय ट्रेनने घरी जायला.. अजून अर्ध्यातही पोहोचलो नाहीये.. घरापासून ऑफिस फक्त 15 किमी अंतरावर आहे पण या ट्र्रॅफिकमुळे 4 तास एकाच ठिकाणी अडकून बसलोय.. आम्ही मुंबईकर आमच्याकडे समुद्र आहे म्हणून नेहमीच माज करत असतो पण म्हणून आम्हाला काय दर पावसाळ्यात रस्त्यावरच समुद्राचा फिल देणार आहेत का? 

Mumbai Rains

अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया देत मुंबईकर आता मुंबई महानगरपालिकेवर टीकेची झोड उठविली आहे. मुंबईत शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने एका तपापूर्वीच्या '26 जुलै'ची आठवण करून दिली आणि मुंबईकरांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. अर्ध्या तासातच अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, अद्यापही अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर, पावसाचा थेट परिणाम रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीवर झाला आहे.

Mumbai Rains

तसं पाहिलं गेलं तर मुंबई आणि पावसाचं वेगळंच नातं.. आता मात्र, हे नातं त्यांच्याच जिवावर उठू लागलं आहे आणि म्हणूनच आता आपल्या Fighting Spiritला कुरवाळत बसण्यापेक्षा आवाज उठविण्यातच शहाणपण आहे हे मुंबईकरांना कळून चुकले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai rains makes people rethink about their real fighting spirit