'तो' आरोपी मोकाट, मुंबई पोलिसांकडून बक्षिस जाहीर

'तो' आरोपी मोकाट, मुंबई पोलिसांकडून बक्षिस जाहीर

मुंबईः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानावर हल्ला करणारा आरोपी अजून ही मोकाट फिरत आहे. या माथेफिरुनं घराच्या परिसरात तोडफोड केली होती. हा आरोपी दादर ते ठाणे चालत गेल्याची माहिती माटुंगा पोलिसांना मिळाली. अजूनही या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही आहे. माटुंगा पोलिस याचा कसून शोध आहे. म्हणून या आरोपीवर मुंबई पोलिसांनी बक्षिसही जाहीर केलं आहे.  आरोपीची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षिस देण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी CCTV फुटेज वरून आरोपीचा फोटोही प्रसिद्ध केला होता. 8 जुलैला या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा पासून माटुंगा पोलिस त्याचा शोध घेताहेत. माज्ञ अद्याप आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. 

हा आरोपीनं घराच्या काचांवर दगडफेक करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली आहे. कुंड्यांचं सुद्धा मोठं नुकसान करण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे या निवासस्थानाला विशेष महत्त्व आहे. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. पोलिसांनी आता राजगृहाला चोविस तास संरक्षण पुरवलेलं असून या हल्ल्यानंतर पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.

आरोपी दादर ते ठाणे पायी चालत 

राजगृहावर तोडफोड करणारा हल्लेखोर  ठाण्यातील तीन हात नाका येथील चौकातून तो चालत जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा हल्लेखोर पुढे भिवंडीच्या दिशेने गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसारही पोलिसांनी तपास सुरु केला होता.

एक जण ताब्यात 

09 जुलैला आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. परेल टीटी भागात हा आरोपी राहणारा असून याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. उमेश जाधव असं त्याचं नाव आहे. उमेश हा प्रेस भागात राहणारा 35 वर्षांचा तरुण आहे. तो बिगारी काम करतो अशी माहिती समोर आली आहे.अधिक तपास केला असता सीसीटीव्ही आणि साक्षीदारांचे जबाब घेतल्यानंतर संशयित आरोपीच मुख्य आरोपी सोबत आणखी एक व्यक्ती असल्याची माहिती समोर आली त्यानुसार पोलिसांनी आपला तपास अधिक वाढवला.

mumbai rajgruha attack matunga police announce reward accused

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com