मतदानोत्सवासाठी मुंबई सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

मतदानासाठी आवश्‍यक साहित्य आज सर्व मतदान केंद्रांवर रवाना झाले आहे.

मुंबई : मुंबईत ९७ लाखांहून अधिक मतदार आहेत. ३३३ उमेदवार मैदानात असून ८१ हजारांहून अधिक कर्मचारी आणि पोलिस निवडणूक सुरळीत करण्यासाठी तैनात असतील. केंद्रांत पाळणाघरही सुरू करण्यात आले आहे. दहा टक्के मतदान केंद्रांवरील कार्यवाही वेबकास्टिंगच्या मदतीने लाईव्ह केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईत १ लाख ३३ हजार नव्या मतदारांची नोंद झाली आहे. त्यातील एक लाख ५ हजार मतदार उपनगरातील आहेत. उर्वरित शहर विभागातील मतदार आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर आग वा इतर दुर्घटना टाळण्यासाठी प्राथमिक प्रशिक्षणही देण्यात आले आहे. एकाच ठिकाणी नऊपेक्षा जास्त मतदान केंद्रे असल्यास तिथे फायरमन तैनात ठेवण्यात येणार आहेत.
मतदानासाठी आवश्‍यक साहित्य आज सर्व मतदान केंद्रांवर रवाना झाले आहे. संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना यंत्रणा सोपविण्यात आली असून दुपारपासूनच मतदान केंद्राच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१० हजार पोलिसांचे टपाली मतदान
मुंबई पोलिस दलातील १० हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानासाठी नोंदणी केली आहे. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना आपले मतदान करता यावे, यासाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा पोलिसांसाठी दिली जात आहे.

दृष्टिक्षेपात...
एकूण मतदार
९७,७२,७६७
पुरुष 
५३,१८,६९३
महिला 
४४,५५,४१४
अपंग 
१०,१७६
मतदान केंद्रे 
९९८९
वाहने 
४१४२
लाईव्ह वेबकास्टिंग 
९१९

------------------
या सुविधा मिळणार
- महिला व पुरुषांसाठी 
- स्वतंत्र रांग
- पाळणाघर  व्हीलचेअर
- जास्तीत जास्त बुथ तळमजल्यावर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai ready for election