मुंबईत ३१ ऑगस्टपर्यंत कसा असेल पाऊस, जाणून घ्या अपडेट्स

समीर सुर्वे
Friday, 28 August 2020

मुंबईच्या पूर्व उपनगरासह महामुंबईत पावसाळी ढग जमा झाले आहेत. त्यामुळे दुपारपर्यंत अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबई: मुंबईच्या पूर्व उपनगरासह महामुंबईत पावसाळी ढग जमा झाले आहेत. त्यामुळे दुपारपर्यंत अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईसह ठाणे नवी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून हलक्या सरी कोसळत असल्याने तापमानात सरासरीपेक्षा दिड अंशाने वाढ झाली आहे. मुंबई वेधशाळेने गुरुवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अशीच परिस्थिती राहाणार होती. मात्र,सकाळपासून मुंबईच्या पूर्व उपनगरासह ठाणे नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात पावसाळी ढग जमा झाले आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस या भागात अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः  वसईत गणपती विसर्जनावेळी सरकारच्या नियमांचा फज्जा
 

मुंबईच्या पूर्व उपनगरात सकाळपासून पावसाच्या तीन चार मोठ्या सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मुंबईत आज दिवसभर वातावरण ढगाळ राहाण्याची शक्यता आहे. शुक्रवार सकाळी 8:30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात सांताक्रुझ येथे 5.2 मिमी आणि कुलाबा येथे 6.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर ,सांताक्रुझ येथे कमाल 31 अंश आणि किमान 25.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.  कुलाबा येथे कमाल 31.4 आणि किमान 25.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai receives light rainfall IMD predicts rain in Mumbai till 31st August


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai receives light rainfall IMD predicts rain in Mumbai till 31st August