मुंबईकरांना मोठा दिलासा! दोन वर्षांनंतर केवळ 96 रूग्णांची नोंद

गेल्या 24 तासत केवळ 96 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
Corona Patient
Corona PatientSakal

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 20 हजारांच्या पुढे कोरोना रूग्णांची नोंद झालेल्या मुंबईकरांना दोन वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाल आहे. मुंबईमध्ये सोमवारी सर्वात निच्चांकी कोरोनो रूग्णांची नोंद करण्यात आली असून आज केवळ 96 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रूग्णसंख्या कमी होत असल्याने मुंबईमधील कोरोना निर्बंध पूर्णपणे शिथील होणार का? असा प्रश्न यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. (Mumbai Records 96 Corona Cases In 24 Hours)

आज 188 जणांना रूग्णालयाचून घरी सोडण्यात आले असून, मुंबईतील रूग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका झाला आहे. सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे कोरोना बाधित होणाऱ्या रुग्ण दुपटीच्या कालावधीमध्येदेखील वाढ नोंदविण्यात आली असून, मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 415 इतकी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com