मुंबई : आरे मधील रस्ता रुंदीकरण रखडणार ; पर्यावरण संघटनांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : आरे मधील रस्ता रुंदीकरण रखडणार ; पर्यावरण संघटनांचा विरोध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या पर्यावरण संदेशनशील क्षेत्रातील आरे जंगलातून जाणारा रस्ता नव्याने बांधून त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. मात्र हे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याने रास्ताच्या रुंदीकरणाला पर्यावरण संघटनांनी विरोध केला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.त्यामुळे या रस्त्याचे काम रखडण्याची शक्यता देखील आहे.

पश्चिम द्रुतगती मार्ग ते पवई-अंधेरीच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे. त्यातील सात किलोमीटर चा रस्ता हा आरे परिसरातून जातो. दोन महिन्यांपूर्वी महानगरपलीकेने या रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी पालिकेने टेंडर देखील मागवले होते. आरे बचाव चा नारा देत काम करणाऱ्या पर्यावरणवादी संघटनांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध दर्शविला आहे. रस्ता रुंदीकरण केला तर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेकडो झाडांवर कुर्हाड चालवावी लागेल असे झोरू भाथेना यांना वाटते. शिवाय रस्त्याची रुंदी वाढवतांन मोठ्या प्रमाणावर खोदकाम करावे लागेल,त्याचा आरे परिसरातील पशु-पक्ष्यांवर परिणाम होईल अशी भीती ही भाथेना यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Nagpur : पाईपलाईन फुटली, आदित्य ठाकरेंनी घेतली दखल

पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी याविषयी काही महिन्यांपूर्वी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी रस्त्याचे रुंदीकरण स्थगित ठेवण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र मेट्रोच्या सुरू असलेल्या कामामुळे पश्चिम द्रुत गती मार्गावरील वाहन आरे मधील या रस्त्यावरून वळवण्यात आली आहेत. त्यावर ही भाथेना यांनी आक्षेप घेतला आहे. पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या परिसरातील वाहनांची वर्दळ कमी करायची आहे. मात्र त्या ऐवजी या परिसरातील वाहनांची वर्दळ वाढवली जात असल्याबद्दल त्यांनी हरकत घेतली आहे.

हेही वाचा: मुंबई : पोलीस स्टेशनमध्येच स्वत:ला पेटवलं; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

याबाबत त्यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून तक्रार दाखल केली होती. या तक्रारींची दखल जिल्ह्याधिकार्यांनी घेतली आहे. त्यांनी याबाबत मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहून याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. मुंबई महानगरपालिका या पत्राला काय उत्तर देणार याकडे पर्यावरणवाद्यांचे लक्ष लागले आहे.

आरे परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. या परीसरात सरसकट वाहनांना परवानगी देता कामा नये. यामुळे परिसरातील वन्यजीवांवर परिणाम होऊ शकतो. जिल्हाधिकारी याची दखल घेतली अशी अपेक्षा आहे.

- झोरू भाथेना,तक्रारदार

loading image
go to top