‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त उद्या रंगणार सेवाकर्तृत्वाचा गौरव सोहळा

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांची रंगीबेरंगी मैफल कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल.
‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त उद्या रंगणार सेवाकर्तृत्वाचा गौरव सोहळा
sakal

मुंबई - गेल्या दोन वर्षांत कोरोनाने (Corona) आपल्याला बरेच काही शिकवले. कैक पटीने हिरावूनही घेतले. मात्र आजची परिस्थिती दिलासादायक आहे. हे सगळे ज्यांच्यामुळे शक्य झाले ते डॉक्टर्स, पोलिस, प्रशासकीय अधिकारी आणि विविध समाजघटक खरोखरच कौतुकास पात्र आहेत. अशा फ्रंटलाईन वर्कर्सना मोलाची साथ दिली ती सामान्य नागरिकांत असलेल्या ‘देवदूतां’नी आणि काही सेवाव्रती संस्थांनी. त्यांच्या कर्तृत्वाचे मोल फक्त शब्दांत व्यक्त करून चालणार नाही. म्हणूनच ‘सकाळ’च्या (Sakal) ५१ व्या वर्धापन (Anniversary) दिनानिमित्त ‘कनेक्टिंग डॉट्‌स’ (Connecting Dots) संकल्पनेअंतर्गत त्यांना गौरवण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवार, २५ मार्च रोजी जुहूतील मुकेश पटेल ऑडिटोरियममध्ये संध्याकाळी साडेचार वाजता ‘सकाळ सन्मान सोहळा’ रंगणार आहे.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांची रंगीबेरंगी मैफल कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोहळ्याचे प्रमुख अतिथी असतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कोरोना संकटकाळात राजकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, मनोरंजन इत्यादी क्षेत्रांतील मान्यवरांनी जीवाची बाजी लावत समाजाची निःस्वार्थ सेवा केली. अशा काही सेवाव्रतींचा सन्मान पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांच्या उपस्थितीत मनोरंजनाचा धमाकेदार कार्यक्रमही सादर होईल.

तारे-तारकांची उपस्थिती

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, पूजा सावंत, मानसी नाईक, संस्कृती बालगुडे, अभिनेता पुष्कर जोग, सिद्धार्थ खिरीद आदी कलाकार आपल्या कला सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवतील. सोबत हास्याचे फवारे उडवायला विनोदवीरांची टीमही आहेच. ज्येष्ठ-श्रेष्ठ काही कलाकार मंडळी सेवाव्रतींच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रक्षेपण ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर करण्यात येणार आहे. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळूनच सभागृहात प्रवेश देण्यात येईल.

कधी : शुक्रवार, २५ मार्च २०२२

केव्हा : सायंकाळी ४.३० वाजता

कुठे : मुकेश पटेल ऑडिटोरियम, एनएमआयएमएस कॉलेज, विलेपार्ले (प.), मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com