esakal | मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेनं उचललं 'हे' महत्वाचं पाऊल; वाचा बातमी..
sakal

बोलून बातमी शोधा

public toilet

शहरातील झोपडपट्ट्या आणि सार्वजनिक शौचालयं यांच्या माध्यमातून कोरोनाची सर्वाधिक प्रमाणात लागण होत असल्याचं पालिकेच्या लक्षात आलं आहे. 

मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेनं उचललं 'हे' महत्वाचं पाऊल; वाचा बातमी..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सरकारनं सर्व नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र तरीही मुंबईत कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढताना दिसत आहेत.  शहरातील झोपडपट्ट्या आणि सार्वजनिक शौचालयं यांच्या माध्यमातून कोरोनाची सर्वाधिक प्रमाणात लागण होत असल्याचं पालिकेच्या लक्षात आलं आहे. 

झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालय कोविडच्या प्रसाराच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्यामुळे शौचालयांचे दिवसातून 5-6 वेळा निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच आता फुट पेडल सॅनिटाझरही पुरविण्यात येत आहे.

हेही वाचा: मोठी दिलासादायक बातमी! मुंबईतील 'या' दोन विभागांनी गाठले शतक; वाचा सविस्तर बातमी..

कोविडचे संक्रमण रोखण्यासाठी वैयक्तीक स्वच्छता महत्वाची आहे .त्यासाठी पालिकेने सार्वजनिक शौचालयांचेे नियमित निर्जंतुकीकरण करण्या बरोबरच हात धुण्यासाठी साबण पाणी ही पुरवले होते. मात्र,आता एच पुर्व म्हणजे खार वांद्रे सांताक्रुझ पुर्व भागात नवा प्रयोग करण्यात येत आहे.या भागातील 200 शौचालयांमध्ये फुट पेडल सॅनिटायझर पुरविण्यात आले आहे.

एच पुर्व हा भाग मे महिन्यांच्या मध्या पर्यंत कोविडचा हॉटस्पॉट होता.मात्र,आता येथे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 108 दिवसांवर पोहचला आहे.या भागात कडेकोट लॉकडाऊन, तपासणी चाचणी आणि उपचार या सुत्रांचा वापर करुन संक्रमण नियंत्रणात आणले आहे.

हेही वाचा: आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाघूम; पावसासाठी आता पुढील महिन्याचीच प्रतिक्षा... 

या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टयाा असल्याने तेथे कोविड नियंत्रणात आणण्याचे आव्हान होते.मात्र,झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण शोधण्याला प्राधान्य देण्या बरोबरच स्वच्छतेलाही प्राधान्य देण्यात आले. 

in mumbai sanitizer will be available at public toilet 

loading image
go to top