मुंबई-सातारा मार्गावर दर तासाला शिवशाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

मुंबई - एसटी महामंडळ मुंबई-सातारा मार्गावर सोमवारपासून दर तासाला शिवशाही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर सर्वाधिक प्रवासी असल्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. पहाटे पाच ते रात्री 11.55 वाजेपर्यंत या बस धावतील.

मुंबई-सातारा मार्गावर सध्या एशियाड बस सुरू आहेत. मुंबई-सातारा शिवशाही बस राष्ट्रीय महामार्ग-चार वरून धावणार आहे. पुणे शहरात प्रवेश न करता ही बस बाहेरून जाणार आहे. त्यामुळे सहा तासांत साताऱ्यात पोहचणे शक्‍य होणार आहे. यासाठी महामंडळाने भाडेतत्त्वावर 20 बसेस चालवण्यासाठी घेतल्या आहेत. या बस नियमित दर तासाला सातारा-मुंबई-सातारा असा प्रवास करणार आहेत. या प्रवासासाठी 500 रुपयांचे तिकीट आहे.

Web Title: mumbai satara route shivshahi