Mumbai : पहिल्याच दिवशीं वंदे भारत एक्सप्रेसमधून १७२० प्रवाशांनी केला प्रवास Mumbai Shirdi Vande Bharat Express first day 1720 passengers traveled | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'वंदे भारत' ट्रेन

Mumbai : पहिल्याच दिवशीं वंदे भारत एक्सप्रेसमधून १७२० प्रवाशांनी केला प्रवास

मुंबई : मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमधून पहिल्याच दिवशी १७२० प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर रविवारी मुंबई ते साईनगर साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे आरक्षण शनिवारी दुपार पर्यत हाऊसफुल झाली आहे. शिर्डीहुन मुंबईला येणाऱ्या गाडीला दुपारपर्यंत चेअर कारला ४१ आणि एक्सिकटिव्ह क्लासला ४ वेटिंग होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या नियमित सेवा शनिवारपासून नागरिकांसाठी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशीं दोन्ही गाड्यामधून १७२० प्रवाशांनी प्रवास केला आहे. ज्यामध्ये

मुंबई - साईनगर शिर्डी २८३ प्रवासी, सोलापूर - सीएसएमटी ९२४ प्रवासी

आणि मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमधून ५१३ प्रवाशांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे,या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या नियमित सेवा शनिवारपासून सुरू झाली आहे. परंतु प्रवाशानी या गाडीला चांगली पसंती दिली. शिर्डीहुन मुंबईला येणाऱ्या गाडीला दुपार पर्यंत चेअर कारला ४१ आणि एक्सिकटिव्ह क्लासला ४ वेटिंग होते.तर रविवारीसाठी असलेल्या सीएसएमटी शिर्डी गाडी साठी १०२४ चेअर कारपैकी ७४८ आणि १०४ एक्सिकटिव्ह पैकी ७६ सीट आरक्षित झाले आहे

सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर येथून शनिवारपासून सुरू झाली. या गाडीला चेअर कार ८३० आणि एक्सिकटिव्ह क्लासचे ९४ सीट बुकिंग करण्यात आले होते. तर शनिवारच्या मुंबई सोलापूर गाडीला ८४८ चेअर कार आणि ७१ एक्सिकटिव्ह क्लासचे बुकिंग करण्यात आले होते.

असे आहे तिकीट दर-

प्रवास तिकीट दर-

- सीएसएमटी ते साईनगर शिर्डी - चेअर कार

रु.८४०, एक्सकेटीव्ह क्लास- रु.१६७०

- सीएसएमटी ते सोलापूर चेअर कार

रु.१०१०, एक्सकेटीव्ह क्लास- रु.२०१५

केटरिंग शुल्कासह तिकीट दर-

- सीएसएमटी ते साईनगर शिर्डी - चेअर कार

रु.९७५, एक्सकेटीव्ह क्लास- रु.१८४०

-सीएसएमटी ते सोलापूर चेअर कार

रु.१३०५, एक्सकेटीव्ह क्लास- रु.२३०५