शिवसेना-भाजपचे मुंबईत शक्तिप्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपने शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी (ता. 17) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर गर्दी जमवण्याचा आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. शनिवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असून, त्यांची चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर सभा होणार आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत नोटा चलनातून बाद करण्याबाबत पंतप्रधान काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त गर्दी जमवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चुरस आहे. 

पंतप्रधानांनी नोटा बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशात गोंधळ उडाला आहे. ग्रामीण भागाला याचा सर्वांत मोठा फटका बसत आहे. गोवा येथील कार्यक्रमात मोदी यांनी नागरिकांना साथ देण्याचे भावनिक आवाहन केले होते. आता मुंबईत ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेनंतर प्रसिद्ध गायक क्रिस मार्टीन यांच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सभेबाबत बुधवारी भाजपचे मुंबईतील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी सभेला गर्दी जमवण्याबाबत नियोजन करण्यात आले. गर्दी कमी दिसू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. फेब्रुवारीतील महापालिका निवडणुकीचे बिगुल या सभेत फुंकले जाणार आहे. 

दरम्यान, शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचा स्मृतिदिन उद्या आहे. शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाजवळ शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दरवर्षीपेक्षा जास्त गर्दी जमवण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

Web Title: Mumbai: Shiv Sena-BJP power display