मुंबईसाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर  

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर आल्यानंतर शिवसेनेतर्फे 100 हुन अधिक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर आल्यानंतर शिवसेनेतर्फे 100 हुन अधिक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. युती तुटल्याने मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 227 जागा शिवसेना लढवणार आहे. शिवसेनेतर्फे अनेक दिग्गजांना यावेळी उमेदवारी नाकारुन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच पक्षात आयत्यावेळी आलेल्यांना ऊमेदवारी दिली गेली. दोन दिवसांपूर्वी भाजपमधून शिवसेनेत आलेले मंगल भानूशाली यांना घाटकोपर पंतनगर प्रभाग क्रमांक 131 मधुन उमेदवारी देण्यात आली. सेनेचे वॉर्ड क्र 144, अणुशक्ती नगरचे विद्यमान नगरसेवक दिनेश उर्फ बबलू पांचाळ भाजपात गेल्याने या वार्डात खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे. 
परळमध्ये विद्यमान नगरसेवक नाना आंबोले व चेंबूरचे नगरसेवक बबलू पांचाळ भाजपमध्ये गेल्याने शिवसेनेत फुट पडली. शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेच्या माजी महापौर विशाखा राऊत आणी मनसेच्या स्वप्ना देशपांडे यांच्यात थेट लढत होणार आहे.

शिवसेनेकडुन यांना एबी फॉर्म देण्यात आले :-
प्रभाग क्रमांक 1 : तेजस्विनी घोसाळकर
प्रभाग क्रमांक 2 :- भालचंद्र म्हात्रे
प्रभाग क्रमांक 3 :- बालकृष्ण बिद्र
प्रभाग क्रमांक 4 :- सुजाता पाटेकर
प्रभाग क्रमांक 5 :- संजय घाडी
प्रभाग क्रमांक 6 ;- हर्षल कारकर
प्रभाग क्रमांक 7 :- शीतल म्हात्रे
प्रभाग क्रमांक 9 :- सचिन म्हात्रे
प्रभाग क्रमांक 10 :- मिलिंद म्हात्रे
प्रभाग क्रमांक 11 :- रिद्धी खूरसुंगे
प्रभाग क्रमांक 13 :- राजा कदम
प्रभाग क्रमांक 14 :- भरती कदम
प्रभाग क्रमांक 15 :- परेश रोणी
प्रभाग क्रमांक 16 :- प्रति दांडेकर
प्रभाग क्रमांक 17 :- डॉ. शिल्पा सौरभ संगोरे
प्रभाग क्रमांक 18 :- संध्या दोशी
प्रभाग क्रमांक 25 :- माधुरी भोईर
प्रभाग क्रमांक 26 :- भारती पदगली
प्रभाग क्रमांक 182: मिलिंद वैद्य
प्रभाग क्रमांक 192 : प्रीती पाटणकर
प्रभाग क्रमांक 191:- विशाखा राऊत
प्रभाग क्रमांक 194:- समाधान सरवणकर
प्रभाग क्रमांक 179:- तृष्णा विश्वासराव
प्रभाग क्रमांक 175:- मंगेश सातमकर
प्रभाग क्रमांक 196- आशिष चेंबूरकर
प्रभाग क्रमांक 193:- हेमांगी वरळीकर
प्रभाग क्रमांक 199:- किशोरी पेडणेकर
प्रभाग क्रमांक 195:- स्नेहल आंबेकर
प्रभाग क्रमांक 203:- इंदू मसूलकर
प्रभाग क्रमांक 216:- अरुंधती दुधवडकर
प्रभाग क्रमांक 222:- मीनाताई कांबळी

Web Title: Mumbai: Shiv Sena declares candidates upcoming election