Mumbai Theft : गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी करणाऱ्या चोराला ओशिवरा पोलिसांकडून अटक

प्रसिद्ध गायक सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी आता आरोपीला कोल्हापुरातून अटक केली.
crime news
crime newsesakal
Summary

प्रसिद्ध गायक सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी आता आरोपीला कोल्हापुरातून अटक केली.

मुंबई - प्रसिद्ध गायक सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी आता आरोपीला कोल्हापुरातून अटक केली. रेहान मुजावर असे आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी 70 लाख 70 हजार रुपये जप्त केले आहेत.

सोनूच्या वडिलांकडून पोलीस तक्रार

आगम कुमार निगम यांच्या घरातून 72 लाख रुपयांची चोरी झाली. त्यानंतर सोनू निगमच्या वडिलांनी मुंबईच्या ओशिवरा पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. सोनू निगमचे वडील आगम कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेहान हा सोनू निगमच्या वडिलांच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पण आठ महिन्यांपूर्वी त्याला कामावरुन काढण्यात आले होते. सोनू निगमच्या वडिलांचा त्याच्यावर संशय होता. ओशिवरा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 380, 454 आणि 457 अंतर्गत ओशिवरा पोलीस ठाण्यात रेहान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता पोलिसांनी रेहानला अटक केली आहे.

आरोपीकडून 70 लाख जप्त

रेहान मुजावरकडून पोलिसांनी 70 लाख 70 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. सोनूच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, रेहान नामक ड्रायव्हर सोनू निगमच्या वडिलांच्या घरी ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. पण त्याचं काम व्यवस्थित नसल्यानं त्याला काही दिवसांआधीच कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. रविवारी 19 मार्चला दुपारी आगमकुमार हे त्यांच्या मुलीच्या निकिताच्या वर्सोवा परिसरातील घरी जेवणासाठी गेले आणि काही वेळाने घरी परतले.

crime news
Mumbai Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!

संध्याकाळी, त्याने आपल्या मुलीला फोन करून लाकडी कपाटात ठेवलेल्या डिजिटल लॉकरमधून 40 लाख रुपये गहाळ झाल्याची माहिती दिली. दुसर्‍या दिवशी, आगमकुमार निगम व्हिसासंबंधी काही कामासाठी 7 बंगला येथे मुलीच्या घरी गेला आणि संध्याकाळी परत आला. त्याला लॉकरमधून आणखी 32 लाख रुपये गहाळ झाल्याचे आढळले,

सीसीटिव्हीने आरोपी टिपला

आगमकुमार आणि निकिता यांनी त्यांच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले ज्यामध्ये त्यांचा माजी ड्रायव्हर रेहान दोन्ही दिवस बाहेर असताना बॅग घेऊन त्याच्या फ्लॅटकडे जात असल्याचे दिसले. तक्रारीनुसार, आगमकुमार याना संशय आहे की रेहानने डुप्लिकेट चावीच्या मदतीने त्याच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि बेडरूममधील डिजिटल लॉकरमधून 72 रुपये चोरल्याचे दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com