Mumbai Fire News : मुंबईत आग सत्र सुरूच! मलाडमध्ये एकाचा होरपळून मृत्यू, तर… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रातिनिधीक फोटो

Mumbai Fire News : मुंबईत आग सत्र सुरूच! मलाडमध्ये एकाचा होरपळून मृत्यू, तर…

मुंबई : मुंबईत सोमवारी आगीच्या दोन घटना घडल्या. सकाळी जोगेश्वरी परिसरात ओशिवरा येथे गोडाऊनला आग लागली. ती आग आटोक्यात येते ना येते तोच मालाडमधील कुरार आनंदनगर आप्पा पाडा परिसरातील झोपडपट्टीला सोमवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली.

या संदर्भात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही आग लागली. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे. आगीत एका अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह सापडला आहे. मृतदेह स्थानिक रुग्णालयात नेण्यात आला असून त्याची ओळख शोधण्याचे काम सुरू आहे. घरगुती सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.

सोमवारी 13 मार्च रोजी दुपारी 4.52 वाजता मालाड येथील करार परिसरातील झोपडपट्ट्याना आगीच्या ज्वाळांनी घेरले. 7.46 मिनिटांनी घटनेची माहिती मिळताच त्यानंतर अग्निशमन दलाची यंत्रे आणि पाण्याचे जंबो टँकर्सना घटनास्थळी पोहोचले.अथक परिश्रमाने अग्नी शमन दलाला आग नियंत्रित करण्यात यश मिळाले.

अग्निशमन दलाच्या कारवाईत अज्ञात व्यक्तीचा भाजलेला मृतदेह सापडला. सध्या मृतदेहाची ओळख पटवली जात आहे. ताडपत्री, प्लास्टिक, लाकडी साहित्य आणि कागदाचा भंगार यांसारख्या ज्वलनशील वस्तूंमुळे झोपडयांमध्येच आग तीव्र पसरत गेली . तसेच आग लागण्यापूर्वी गॅस सिलेंडर स्फोट झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. या परिसरातील आगीच्या धुराचे लोट काही किलोमीटर अंतरावरून स्पष्ट दिसत होते

एकाच दिवसात दुसरी घटना

मुंबईत आज आगीच्या दोन घटना नोंदवल्या गेल्या. मालाड आधी जोगेश्वरी येथील घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला सोमवारी सकाळी आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 12 ते 14 गाड्यांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला होता.

तब्बल दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलेली आग फायर कूलिंगद्वारे काही तासात आटोक्यात आणली. आग आटोक्यात आली असली तर यात तब्बल 20 ते 25 फर्निचरची गाळे जळून खाक झाली आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. मुख्य रस्त्यावरच ही आगीची घटना घडली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळाली. वाहतूक पोलिसांनी आता एस व्ही रोड वाहतुकीसाठी बंद केला होता.

टॅग्स :Mumbai News