यंत्रमानव सोफिया मुंबईच्या चर्चासत्रात!

यंत्रमानव सोफिया मुंबईच्या चर्चासत्रात!

मुंबई - जगभरात कुतूहलाचा विषय ठरलेली "सोफिया' आता मुंबईला भेट देणार आहे. सोफिया म्हणजे नागरिकत्व मिळालेला पहिला यंत्रमानव (रोबो) आहे. या सोफियाशी शनिवारी (ता. 30) मुंबई आयआयटीमध्ये विद्यार्थी संवाद साधणार आहेत.

मानवी भावना व्यक्त करणारी सोफिया हा विज्ञानाचा अनोखा आविष्कार मानला जातो. सौदी अरेबियाने या रोबोला चक्क नागरिकत्व बहाल केले आहे. आयआयटीच्या "टेकफेस्ट'मध्ये सोफियाला निमंत्रित करण्यात आले आहे. सोफियाला बनवणाऱ्या कंपनीने याला होकार दिला आहे. आयआयटी अनेक महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा करत होती. याबाबत अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्‍यता आहे.

"टेकफेस्ट'मध्ये दरवर्षी नवनव्या रोबोंचे सादरीकरण होते. तज्ज्ञांची चर्चसत्रे होतात. यंदा प्रथमच चर्चासत्रात चक्क रोबो सहभागी होणार आहे. यापूर्वी बनवलेले मानवी रोबो मानवी भावना व्यक्त करू शकत नव्हते. सोफिया हसू शकते, रडूही शकते. सोफियाच्या "जन्मा'पासूनचा सर्व प्रवास आयआयटीच्या विद्यार्थ्यांपुढे मांडला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com