नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक अत्याधुनिक मास्क; जो केवळ कोरोनाला रोखणार नाही तर मारेलही

सुमित बागुल
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कंपनीच्या दाव्यानुसार या मास्कला आंतरराष्ट्रीय दर्जाचं International Organization for Standardization म्हणजेच ISO मानांकन मिळालंय.

मुंबई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी SMS चा नियम पाळणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. अशात SMS म्हणजे नक्की काय ? तर सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझर. एव्हाना हे आपल्या सर्वांच्या अगदी पक्कं डोक्यात बसलंय देखील. या दृष्टीने आपण पावलं टाकत आपण ते अमलात देखील आणतोय. या व्यतिरिक्त कोरोनापासून आपला पिच्छा सोडवण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक प्रयोग आणि संशोधनं सुरु आहेत. यामध्ये कोरोनावरील उपचार काय असावेत, कोरोनासाठी गोळ्या किंवा लस बनवण्यावरही भर आहे.

या नवनवीन प्रयोगांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून एक चांगली माहिती समोर येतेय. मुंबईतील एका कंपनीने एक ऍडव्हान्स मास्क तयार केलाय. हा मास्क साधासुधा नसून हा मास्क कोरोना विषाणूला आपल्या नाकात किंवा घशात जाण्यास रोखतोही आणि कोरोनाचा खातमा देखील करतो असा कंपनीचा दावा आहे. 

मोठी बातमी संशोधनातून समोर आली नवीन माहिती, 6 फूट उंच व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक

मुंबईतील स्टार्टअप थरमॅसेंसने या मास्कची निर्मिती  केली आहे. या कंपनीच्या माहितीप्रमाणे हा मास्क अत्याधुनिक नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवलाय. एखादा साधा मास्क केवळ विषाणू आपल्या नाका किंवा तोंडावाटे शरीरात जाण्यास मज्जाव करतो. मात्र हा अत्याधुनिक मास्क त्या कोरोना विषाणूचा खातमा देखील करतो असंही कंपनी म्हणतेय.   
   
मास्क नेमका बनवलाय कसा ? 

  • हा मास्क कापडापासूनच बनवलेला आहे. 
  • हा मास्क बनवण्यासाठी ज्या कापडाचा वापर केलाय, त्यात नॅनो टेक्नॉलॉजी वापरली गेलीये 

मोठी बातमी मुंबईतील  ‘या’ महाविद्यालयाने घेतला सुमारे 40 तुकड्या बंद करण्याचा निर्णय 

 

Thermaissance's Reusable Face Mask

मास्कबद्दलच्या परीक्षणात काय निष्कर्ष समोर आलेत ? 

  • कंपनीच्या दाव्यानुसार या मास्कला आंतरराष्ट्रीय दर्जाचं International Organization for Standardization म्हणजेच ISO मानांकन मिळालंय. सोबतच भारतीय नॅशनल ऍक्रेडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरोटरीज म्हणजेच NABL कडूनही या मास्कचा मान्यता मिळालीये. 
  • कंपनीच्या दाव्यानुसार हा मास्क तुम्ही मशीनमध्ये तब्बल शंभरवेळा तर हाताने धुतल्यास तब्बल दीडशे वेळेस वापरू शकतात
  • अमेरिकन परीक्षणानुसार हा मास्क एका तासात ९९.९९ टक्के विषाणू मारतो तर साधारण पाच मिनिटात हा मास्क तब्ब्ल ९३ टक्के विषाणू मारू शकतो. 

mumbai startup company makes a advance mask with nano technology which can kill virus

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai startup company makes a advance mask with nano technology which can kill coronavirus