आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट, कलम १४४ लागू झाल्यानंतर म्हणालेत घाबरू नका

सुमित बागुल
Friday, 18 September 2020

खरंतर मुंबईकरांमध्ये लॉकडाऊन पुन्हा लागलाय का याची भीती वाढण्याचं कारण म्हणजे मुंबईत पुन्हा डोकं वर काढताना दिसणारा कोरोना

मुंबई : 16 तारखेला मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलंय. मात्र या बातमीनंतर मुंबईकरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागला की काय अशी भीती पसरली होती.

यावर शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्य सरकारमधील पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर चे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुंबईकरांना घाबरू नका असं आवाहन केलंय. 'मुंबईमध्ये कलम १४४ लागू करण्याचा पोलिसांनी काढलेला आदेश जुनाच आहे. खरंतर ३१ ऑगस्ट रोजीचा जमावबंदीचा निर्णय पुढे तसाच सुरु राहणार असणार आहे, त्याचा एवढाच अर्थ आहे असं मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

महत्त्वाची बातमीमुंबईकरांनो अत्यंत महत्त्वाची बातमी, उद्यापासून KEM मध्ये सुरु होणार कोविशील्ड लसीच्या चाचण्या
 

खरंतर मुंबईकरांमध्ये लॉकडाऊन पुन्हा लागलाय का याची भीती वाढण्याचं कारण म्हणजे मुंबईत पुन्हा डोकं वर काढताना दिसणारा कोरोना. गेल्या काही दिवसात वर गेलेला मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर खाली येताना पाहायला मिळतोय. एकीकडे अनलॉक होत असलेली मुंबई आणि दुसरीकडे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येतेय का अशीही भीती मुंबईकरांना सतावतेय.

म्हणूनच काल बातमी आल्यानंतर मुंबईकरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागला की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. मुंबई पोलिसांकडून जमावबंदीचा निर्णय पुढे सुरु ठेवण्यात आलाय त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत ही जमावबंदी लागू राहील. या अंतर्गत मुंबईत एका वेळी चार पेक्षा अधिकांना एका जमण्याची, भेटण्याची किंवा फिरण्याची परवानगी नाही.

mumbai suburbs guardian minister aaditya thackerays reaction on section 144 extended in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai suburbs guardian minister aaditya thackerays reaction on section 144 extended in mumbai