मुंबईकरांनो थांबा, कारण आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

उद्या जर तुम्ही मुंबईतील लोकलने कुठे जायचा प्लान करत असाल तर जरा थांबा. कारण उद्या लोकलच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मुंबई : जर तुम्ही मुंबईतील लोकलने कुठे जायचा प्लान करत असाल तर जरा थांबा. कारण आज (रविवार) लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. परळ स्थानकातून लोकल पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. 

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते 3.35 दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार असून यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहतील.

हार्बर रेल्वे 

हार्बर रेल्वेवर 11.30 ते 4.00 दरम्यान पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पनवेल-वाशी मार्गादरम्यान अप आणि डाऊन दिशेच्या लोकल फेऱ्या बंद राहतील. ब्लॉक दरम्यान ठाणे-वाशी आणि ठाणे-नेरुळ मार्गावरील लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत. दरम्यान  खारकोपर-नेरुळ-खारकोपर मधल्या लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी-वाशी मार्गावर विशेष जादा गाड्या चालवल्या जातील.

Webtitle : mumbai sunday megablok details 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai sunday megablok details