esakal | Mumbai: भाजप नेत्यांचे वर्तन मुघलांसारखे : सुप्रिया सुळे
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार सुप्रिया सुळे
भाजप नेत्यांचे वर्तन मुघलांसारखे : सुप्रिया सुळे

भाजप नेत्यांचे वर्तन मुघलांसारखे : सुप्रिया सुळे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘प्रचारात सतत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे भाजप नेत्यांचे वर्तन मात्र प्रत्यक्षात मुघलांसारखे आहे. मुघलांप्रमाणेच केंद्रातील भाजप नेते महिलांना त्रास देत आहेत.’’ अशी घणाघाती टीका करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘‘आमच्या बहिणी या सावित्रीबाई फुले व जिजाऊंच्या मातीतल्या लेकी असल्याने त्या लढाऊ आहेत. कोणत्याही कारवाईला त्या घाबरणाऱ्या नाहीत. हे दिल्लीतील भाजप नेत्यांनी विसरू नये.’’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरावर आणि व्यावसायिक कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाने छापे घातल्याचा निषेध सुप्रिया सुळे यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी स्वतः राजकारणात आहे. आमच्यावर राजकीय सूडबुद्धीने आरोप अथवा कारवाई झाली तर ते आम्ही समजू शकतो पण राजकीय आणि सार्वजनिक जीवनात ज्या महिला नाहीत पण त्या केवळ आमच्या बहिणी आहेत.

हेही वाचा: पुणे : विद्यमान २७ नगरसेवकांचे भवितव्य अस्पष्ट

या कारणापोटी त्यांच्यावर करवाई होत असेल तर हे दडपशाहीचे राजकारण आहे. हे राजकारण अत्यंत वाईट आहे, अशी खंतही सुळे यांनी व्यक्त केली. दरम्यान, निवडणुकांच्या प्रचारात भाजपचे हे नेते छत्रपतींचे नाव घेतात. पण त्यांची कृती मात्र मुघलांसारखी असते. छत्रपतींच्या स्वराज्यात महिलांवर अन्याय होत नव्हता पण मुघलांच्या राजवटीत मात्र महिलांवर अन्याय झाला. सध्या केंद्रातील भाजप सरकारच्या कृतीमध्येही अशीच मुघलाई दिसत आहे अशा संतप्त भावनाही खासदार सुळे यांनी व्यक्त केल्या.

loading image
go to top