Mumbai : बीबीसीत आयकर विभागाचे सर्वेक्षण;कर चुकवल्याचे सर्वेक्षणात निरीक्षण

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी कार्यालयातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे काही कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळत आहे.
bbc news
bbc newssakal

मुंबई - मुंबई आणि दिल्ली येथील बीबीसी इंडियाच्या कार्यालयात 60 तास सर्वेक्षण आयकर विभागातर्फे करण्यात आले. या संदर्भात सर्वेक्षणात बीबीसी इंडिया समुहातर्फे कर चूकवल्याचे निरीक्षण आयकर विभागाने केले आहे.

मुंबईतील बीबीसी कार्यालयात आयकर विभागाचे 59 तास सलग सुरू असलेले सर्वेक्षण अखेर गुरूवारी रात्री 10 वाजता संपले. 14 फेब्रुवारी मंगळवारी सकाळी 11 वाजता बीबीसी कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 59 तास सलग सर्वेक्षण केले.

bbc news
Mumbai : महाशिवरात्री निमित्त बेस्टची विशेष बससेवा

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी कार्यालयातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे काही कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

काय सांगते सर्वेक्षण

आयकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की विविध भारतीय भाषांमध्ये माध्यम चालवत आहेत.मोठ्या प्रमाणात समूहाचा व्याप असूनही बीबीसीचे असलेले उत्पन्न/नफा भारतातील कामकाजाच्या व्याप्तिशी सुसंगत प्रमाणात नाही.

सर्वेक्षणादरम्यान, विभागाने संस्थेच्या कार्याशी संबंधित अनेक पुरावे गोळा केले जे दर्शवितात की समूहाच्या परदेशी संस्थांद्वारे भारतातील उत्पन्न म्हणून उघड न केलेल्या काही उत्पन्नातून कर भरला गेला नाही. कर चुकवल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केले आहे.

पुढे, सर्वेक्षणात ट्रान्सफर प्राइसिंग डॉक्युमेंटेशनच्या संदर्भात अनेक विसंगती देखील समोर आल्या आहेत. सर्वेक्षण ऑपरेशनमुळे कर्मचार्‍यांचे स्टेटमेंट, डिजिटल पुरावे आणि कागदपत्रांद्वारे महत्त्वपूर्ण पुरावे सापडले आहेत ज्यांची तपासणी केली जाणार आहे.

bbc news
Mumbai : 25 वर्षे फरारी असलेला सराईत गुंडाला जेरबंद करण्यात रफी अहमद किदवाई मार्ग पोलिसाना यश

सर्वेक्षण करताना कर्मचाऱ्यांचे जवाब अशाच कर्मचाऱ्यांचे नोंदवले गेले होते ज्यांची भूमिका महत्त्वाची होती. यात प्रामुख्याने वित्त, सामग्री विकास आणि इतर उत्पादनाशी संबंधित महत्त्वाच्या कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवण्यात आले आहे

आयकर विभागाची कारवाई

मंगळवारी आयकर विभागाच्या चार सदस्यीय पथकाने सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथील ब्रिटीश ब्रॉडकास्टर म्हणजेच बीबीसीच्या कार्यालय असलेल्या विंडसर इमारतीत दाखल झाले.

बीबीसीत कंपनीतील कर संबंधातील दस्तऐवजांची तपासणी करण्यासाठी आयकर विभागाच्या टीमने बीबीसीच्या कार्यालयात पोहोचली होती. आयकर विभागाचे मंगळवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेलं 59 तास सलग चाललेले सर्वेक्षण गुरूवारी रात्री 10 वाजता संपले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com