Tanker Driver Strike : मुंबईतील टँकर चालक मध्यरात्रीपासून संपावर

विविध मागण्यांसाठी मुंबईतील सुमारे अडीच हजार टँकर्स चालकांनी ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.
Strike
Strikeesakal
Summary

विविध मागण्यांसाठी मुंबईतील सुमारे अडीच हजार टँकर्स चालकांनी ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.

Summary

मुंबई - १३ विविध मागण्यांसाठी मुंबईतील सुमारे अडीच हजार टँकर्स चालकांनी ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या संपाचा फटका हॉटेल्स, मॉल्स, रुग्णालयांना तसेच विकास कामांना बसला आहे. सरकारच्या नव्या नियमातील जाचक अटींना टँकर असोसिएशनने विरोध केला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी टँकरधारक संपावर गेल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले.

मुंबईत रुग्णालये, मॉल्स, हॉटेल, सोसायट्याना तसेच विकास कामांच्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मुंबईत दोन हजारहून अधिक टँकर आहेत. त्यामुळे टँकरवर अवलंबून असणाऱ्या ना याचा फटका बसला आहे.

मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथोरिटीच्या या नियमांची अंमलबजावणी ही फक्त मुंबईत केली जात असल्याने या विरोधात ८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशने संप पुकारला आहे. मुंबईमध्ये अडीच हजार टँकर्स असून विविध ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. वॉटर टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांना संपामुळे अडचणींना सामोरे जावे लागते आहे.

नवे नियम

- वॉटर टँकर पुरवणाऱ्या मालकाकडे मुंबईत दोन हजार स्क्वेअर फिटची जागा हवी. या जागेमध्ये टँकर पाण्याने भरले जावे, रस्त्यावर कुठेही टँकर पाण्याने भरु नये

- पाच ते पंधरा वॉटर टँकरसाठी रोज प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असेल शिवाय लॉक शीट तयार करावे लागणार

- टेलिस्कोपिक मीटरचा वापर करणे आवश्यक

- प्रशासनाला वॉटर टँकर सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी अॅडव्हान्स द्यावा लागणार शिवाय एनओसी काढावी लागणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com