मुंबईतील पारा पस्तिशीपलीकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

मुंबई - वाऱ्यांची दिशा पुन्हा बदलल्यामुळे मुंबईत दोन दिवस सूर्य आग ओकत आहे. मंगळवारपासून पारा पस्तिशीवर कायम असून, शुक्रवारी तो 36 अंशावर पोहचेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

एकीकडे नोव्हेंबरअखेर गुलाबी थंडी सुरू होईल, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता; परंतु कमाल आणि किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांनी वाढ होत असल्याने या महिन्यात सतत नवनवीन रेकॉर्ड नोंदवले जात आहे. हवेची दिशा बदलल्यामुळे तापमानात बदल झाला आहे. जमिनीवरून वाहणारे उष्ण वारे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना थोपवून धरत आहेत.

Web Title: mumbai temperature