मुंबई, ठाण्यात येत्या बुधवारी अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

दोन आठवड्यांपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. मात्र, बुधवारपासून जोरदार पाऊस बरसणार आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये बुधवारी (ता. 24) अतिवृष्टी होईल, तर गुरुवारी पावसाचा जोर थोडा कमी होत मुसळधार सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.

मुंबई - दोन आठवड्यांपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. मात्र, बुधवारपासून जोरदार पाऊस बरसणार आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये बुधवारी (ता. 24) अतिवृष्टी होईल, तर गुरुवारी पावसाचा जोर थोडा कमी होत मुसळधार सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. मराठवाड्यात सोमवारपासून, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून पावसाला जोर येईल. दक्षिण कोकण ते उत्तर केरळपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि नजीकच्या भागांत वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे. या वातावरणात पावसाचा जोर अधिक वाढतो. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस चांगला होत आहे. दक्षिण कोकणात पाऊस सुरवातीपासूनच चांगला आहे. मात्र, पावसाच्या गैरहजेरीमुळे मुंबईत उकाडा वाढला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Thane Heavy Rain Wednesday