मुंबई : निवडणुकीच्या तयारीसाठी रिपब्लिकन पक्षाची मंगळवारी महत्वपूर्ण बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : निवडणुकीच्या तयारीसाठी रिपब्लिकन पक्षाची मंगळवारी महत्वपूर्ण बैठक

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश मधील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक येत्या मंगळवार (ता.16) नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक केंद्र कालिना सांताक्रूझ पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे.या महत्वपूर्ण बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहुन प्रमुख मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

हेही वाचा: कंडोम किंग म्हणून जगभर ओळख, कोण आहे तो?

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. त्यासाठी भाजप सोबत युती करून किती आणि कोणत्या जागा रिपाइंने जगावाटपात घ्याव्यात यासह विविध विषयांवर चर्चा करून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी या बैठकीत करण्यात येणार असून या बैठकीस रिपाइं चे मुंबईतील सर्व वॉर्ड अध्यक्ष; तालुका आणि जिल्हा अध्यक्षांनी आणि राष्ट्रीय ; राज्य कार्यकारिणी च्या सदस्यांनी तसेच सर्व आघाडी च्या प्रमुखांनी या बैठकिस उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.

loading image
go to top