मुंबई : प्रियकराने केली आपल्याच प्रेयसीच्याच घरात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
मुंबई : प्रियकराने केली आपल्याच प्रेयसीच्याच घरात चोरी

मुंबई : प्रियकराने केली आपल्याच प्रेयसीच्याच घरात चोरी

मुंबई - मुंबईत आपल्या प्रियासीच्या घरात चोरी करणाऱ्या प्रियकर चोरास त्याच्या 2 खाजगी गुप्तहेर साथीदारांसोबत ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. 14 जुलैच्या मध्यरात्री अंधेरी येथील लोखंडवाला येथील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये प्रवेश करून 11 लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने पळवल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याची नोंद ओशिवरा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. गुन्ह्याच्या 48 तासांनंतर दोन खाजगी गुप्तहेरांसह तीन चोरट्यांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आली.

एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, ओशिवरा पोलिसांनी 17 जुलै रोजी बोरिवली येथून आरोपीला पकडले आणि प्रितेश मांजरेकर रोहित कोरडे आणि रोहित हेगडे यांच्याकडून चोरीची मालमत्ता जप्त केली. पहिला आरोपी फिर्यादी मुलीचा प्रियकर होता, त्याने ही योजना आखली.

मुंबईतील अंधेरी येथे राहणारी पूजा विश्वास तिच्या मैत्रिणीसोबत रात्री दहाच्या सुमारास जेवायला बाहेर पडली. ती निघून गेल्यावर तिन्ही आरोपींनी इमारतीत प्रवेश केला. इतर दोघांनी स्वतः खाजगी गुप्तहेर असल्याचा दावा केला. त्यांच्याविरुद्ध चोरीची कोणताही गुन्ह्याची नोंद नाही. पोलिस तपास अधिकार्‍यांनी या तिघांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात डझनभराहून अधिक सीसीटीव्ही तपासले. अखेरीस पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपींना अटक करण्यात आली.

टॅग्स :crimeMumbaithief