मुंबई : ट्रॅफिक चलनाची १३४ कोटी रुपयांची थकबाकी; ७ लाख वाहन धारकांना नोटिसा

मुंबईकरांनी भरले नाहीत ट्रॅफिक चलनाची १३४ कोटी रुपये
Traffic Police
Traffic Police sakal media

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी (Mumbai traffic police) ७ लाख ७६ हजार वाहनधारकांना (Vehicle owner) डिसेंबरमध्ये होणाऱ्या लोक अदालतमध्ये (Public court) हजर राहण्यासाठी नोटीसा (Notice) पाठवल्या आहेत. त्यांच्या गाड्यांवर वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळं (Traffic rules break) ४१ लाख ई-चलन (E-challan) जनरेट झाले आहेत. ज्यांची किंमत जवळपास १३५ कोटी रुपये आहे.

ज्या व्यक्तींनी वारंवार मेसेज पाठवूनही ई-चलनची मोठी रक्कम भरली नाही, अशा डिफॉल्टर्सना लोकअदालतमध्ये हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली जाते. दर तीन महिन्यांनी अशी लोकअदालत भरवली जाते. यात अनेजण त्यांचा दंड भरतात. ई-चलन हे गाडीच्या रजिस्ट्रेशनवेळी देण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर पाठवलं जातं, पण अनेक ग्राहकांचे मोबाईल नंबर नंतर बदलतात, ते अपडेट होत नाहीत, पर्यायानं त्यांना त्यांच्या गाडीवर जनरेट झालेलं अचलान मिळत नाही, याचा अनेकजण गैरफायदाही घेतात. अनेक नागरीक जनरेट झालेल्या इ चलानला चॅलेंज करतात, चुकीच्या पद्धतीनं इचलान जनरेट झाल्याचं सांगत पैसे देण्याचं टाळतात, त्यांना आम्ही न्यायालयात जाण्याचा मार्ग सुचवतो, असं मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

ट्रॅफिकचे नियम न पाळल्यानं ई-चलन जनरेट व्हायला लागल्यापासून अनेकजण नियम तोडूनही पैसे भरत नाहीत. काही जणांच्या नावावर एकापेक्षा जास्त गाड्या असतात, त्यातल्या काही गाड्यांवर सतत नियम तोडल्यामुळं दंडाची मोठी रक्कम भरायची बाकी असते. ते कोणत्याही नोटीसीला उत्तरं देत नाहीत, लोकअदालतमध्ये हजर रहात नाहीत, अशा नागरीकांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मागच्या लोकअदालतमध्ये चांगला प्रतिसाद

सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या लोक अदालतमध्ये २ लाख इ चलान पेड करण्यात आले होते, त्याची रक्कम जवळपास ६ कोटी ७६ लाखांची वसुली झाली होती. त्यामुळं ११ डिसेंबरला होणाऱ्या लोकअदालतमधूनही चांगली वसुली होईल अशी आशा ट्राफीक पोलिसांना वाटतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com