
Mumbai : ट्रान्झिट कॅम्पमध्ये आगीचा भडका
मुंबई : सांताक्रूझ पूर्व, तबेला रोड गोळीबार रोड ट्रान्झिट कँम्प येथे सकाळी 7 च्या दरम्यान आगीचा भडका उडाला. ट्रान्झिट कँम्पमध्ये असणाऱ्या तळ मजल्यावर असणाऱ्या कार्यालयात अचानक मीटर बाॅक्सला आग लागली.
आग एवढी भडकली की तिथे राहणाऱ्या आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी तात्काळ कँम्पमधून नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पसरलेल्या धुरामुळे लोकांनी आधी आपला जीव वाचवण्याची धडपड केली. या आगीत सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. तसेच आगीत संपूर्ण घर आणि अनेकांचा संसार जळून राख झाला.
अर्ध्या तासानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आणि पाण्याच्या फवार्याने आग विझवली. तळमजल्यावर लागलेली आग चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे, कॅम्प मध्ये राहणार्या ज्येष्ठ नागरिकांना आधी खाली उतरवण्यात आले, त्यामुळे जीवितहानी टळली.