esakal | Covovax Vaccine: 2 ते 7 वयोगटातील लहान मुलांवर नायर रुग्णालयात चाचणी सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

कोवोवॅक्स लसीची ट्रायल

2 ते 7 वयोगटातील लहान मुलांवर नायर रुग्णालयात चाचणी सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना वरील कोवोवॅक्स या लसीची लहान मुलांवर चाचणी करण्यात येत आहे. पालिकेच्या बी.वाय.एल नायर रुग्णालयांत ही चाचणी सुरू आहे. 2 ते 17 वयोगटातील 3 मुलांना लस देण्यात आली असून पुढील सहा महिने ही चाचणी सुरू राहणार आहे. नायर रुग्णालयात आता कोवोवॅक्स लसीची लहान मुलांवरील चाचणी सुरू झाली आहे. आतापर्यंत 3 मुलांना लस देण्यात आली आहे. नायर रुग्णालयात 2 ते 17 वयोगटातील आणखी 920 मुलांवर ही ट्रायल घेण्यात येणार आहे. त्यातील 460 मुलं 2 ते 11 वयोगटातील तर 460 मुलं 12 ते 17 वयोगटातील आहेत. ही ट्रायल साधारणपणे सहा महिने सुरू राहील. यात तीन मुलांना 0.5 एमएल लस आणि एकाला प्लासीबो देण्यात येईल.

हेही वाचा: पुणे : डॉक्टर दाम्पत्याचा एक्सलंन्स इन होलिस्टिक हेल्थकेअर पुरस्काराने गौरव

नायर रुग्णालयात सुरू झालेल्या कोवोवॅक्स लसीच्या ट्रायलसाठी 3 जणांची नोंदणी झाली आहे. यात 0.5 एमएल डोस देण्यात येणार आहे. दुसरा डोस 21 दिवसांनी दिला जाणार आहे. सहा महिने पर्यंत या मुलांवर लक्ष देण्यात येणार आहे. 21, 36 आणि 180 दिवसांनी त्यांच्यातील अँटिबॉडी तपासणी करण्यात येणार आहे.सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने 'कोवोवॅक्स' लसीची निर्मिती केली आहे. 'कोवोवॅक्स' लस कितपत सुरक्षित आहे आणि लस घेतल्यानंतर किती प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, ते तपासण्यासाठी 20 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या होणार आहेत. या 20 पैकी आठ रुग्णालये महाराष्ट्रातील आहेत.

लहान मुलांसाठीच्या झायडस कॅडिला कंपनीकडून निर्मित 'झायकोव्ह डी' लशीची यापूर्वीच चाचणी झाली आहे. लहान मुलांसाठी ही लस परिणामकारक असल्याचे सांगितले जाते. राज्यातील 14 केंद्रांवर चाचणी घेण्यात आली होती. मुंबईतील नायर, जे. जे. रुग्णालय चाचणी झाली होती.सध्या ही लस मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा: मावळातील अल्पपरिचित लेणी आणि धबधबे

जगात 30,000 मुलांवर ही ट्रायल झाली आहे. ऑस्ट्रेलिया, युके, दक्षिण आफ्रिका,अमेरिकेत ही ट्रायल झाली आहे. त्यातून कोणाला दुष्परिणाम झालेला नसल्याचे ट्रायल झालेल्या देशाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नायर रुग्णालयात ही ट्रायल सुरू झाली आहे.

- डॉ. रमेश भारमल, संचालक, मुख्य पालिका रुग्णालये

loading image
go to top