
मुंबईतील मानखुर्द परिसरात शनिवारी 29 एप्रिल रोजी एका 31 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन फरार आरोपींना काल अटक करण्यात आली.
Mumbai Crime : महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन फरार आरोपींना काल अटक
मुंबई - मुंबईतील मानखुर्द परिसरात शनिवारी 29 एप्रिल रोजी एका 31 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी दोन फरार आरोपींना काल अटक करण्यात आली. सोनू सिंग आणि त्याचा मुलगा आतिस सिंग अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींना 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी न्यायलयाने सुनावली आहे.मुंबईतील मानखुर्दमध्ये दोन कुटुंबात काही कारणावरून वाद झाल्यानंतर मारामारी झाली आणि त्यानंतर गोळीबार झाला. या गोळीबारात फरजाना इरफान शेख या महिलेचा मृत्यू झाला.
29 एप्रिल रोजी संध्याकाळी मुंबईतील मानखुर्द येथील इंदिरा नगर मंडळ परिसरात दोन कुटुंबातील महिलांमध्ये भांडण झाले होते. त्याचवेळी महिलेच्या पती आणि मुलाने गोळीबार केला होता. त्यामुळे फरजाना इरफान शेख यांच्या छातीत गोळी लागली. काही वेळातच पीडित महिलेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार, 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6.35 च्या सुमारास घडली. सोनू सिंग आणि त्याचा मुलगा आतिस सिंग अशी आरोपींची नावे आहेत. आता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेवर गोळी झाडून दोघेही तेथून पळून गेले. ज्यांना रविवारी रात्री अटक करून पुढील तपासासाठी मुंबईत आणण्यात आले आहे.