सामान्य कार्यकर्त्यासाठी उद्धव ठाकरेंचा कॉल अन् विचारपूसही

शिवसेनेच्या सोशल मिडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांना नुकतीच आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकाकडून शिविगाळ झाल्याचा व्हॉईस मॅसेज व्हायरल झाला होता.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal
Summary

शिवसेनेच्या सोशल मिडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांना नुकतीच आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकाकडून शिविगाळ झाल्याचा व्हॉईस मॅसेज व्हायरल झाला होता.

मुंबई - शिवसेनेच्या सोशल मिडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांना नुकतीच आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकाकडून शिविगाळ झाल्याचा व्हॉईस मॅसेज व्हायरल झाला होता. हा मॅसेजची दखल घेऊन खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्याला फोन करत विचारपूस केली. सामान्य माणसाला जपणारे पक्षप्रमुख अशी भावना या कार्यकर्तीने व्यक्त ट्विटरवर व्यक्त केली आहे. याचवेळी अयोध्या पौळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांवरही टीकास्त्र सोडले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी सामान्य कार्यकर्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या पाठपुराव्याचाही उल्लेखही ट्विटरवर केला आहे.

याआधी बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून दिवसभरात पाचवेळा फोन आले होते. त्यामध्ये शिविगाळ करणारी व्हॉईस क्लीपदेखील व्हायरल झाली होती. परंतु जीव गेला तरी हरकत नाही गद्दार लोकांबद्दल लिहिणारच अशी भूमिका अयोध्या पौळ यांनी मांडली होती. परंतु बांगर समर्थकांकडून मात्र सोशल मिडियावर न लिहिण्याची धमकी देण्यात येत होती.

या मॅसेजची दखल घेऊनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री १२ वाजून १६ मिनिटांनी या कार्यकर्त्याला फोन केला. त्याचवेळी काळजी घेण्याचा आणि कोणतेही धाडस एकट्याने न करण्याचा सल्लाही ठाकरेंनी दिला. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणाची नोंद करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर विजय कामटेकर यांनी मदत आमदारांची फौज बिल्डिंगखाली उभी केल्याचे ट्विट अयोध्या पोळ यांनी केले. तसेच आमदार अजय चौधरी आणि रमाकांत रहाटे यांनीही सतत फॉलोअप केल्याचे ट्विट पौळ यांनी केले आहे. पक्षप्रमुख भेटत नव्हते असे धडधडीत खोट बोलणाऱ्या आमदारांवर गद्दार अशीही टीका पौळ यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com