संकलनात कमी पडल्याची मुंबई विद्यापीठाची कबुली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाची कीर्ती जागतिक स्तरावर पसरली आहे. विद्यापीठाच्या हद्दीतील बहुतांश महाविद्यालयांत "प्लेसमेंट'च्या सुविधा आहेत; परंतु ही माहिती गोळा करण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुली विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांनी दिली. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या उच्च शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्ता क्रमवारीत पहिल्या 100 क्रमांकांत स्थान मिळवू न शकलेल्या मुंबई विद्यापीठावर आता टीका होऊ लागली आहे. देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या 10 विद्यापीठांत येण्याचा बहुमान पुणे विद्यापीठाने पटकावला आहे. कुलसचिव खान म्हणाले की, मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक जागतिक स्तरावर आहे; मात्र गुणवत्ता क्रमवारीतील आवश्‍यक निकषांबाबत पुरेशी माहिती संकलित करण्यात विद्यापीठ प्रशासन कमी पडले. आता विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता विभाग (इंटर्नल क्वालिटी सेल) छाननी करील. पुनर्विचार करील. यंदा पहिल्यांदाच या "रॅंकिंग'मध्ये विद्यापीठाने सहभाग घेतला होता. पुढील वर्षी माहिती योग्य पद्धतीने संकलित करून पाठवली जाईल, असेही ते म्हणाले. 

Web Title: Mumbai University Admission fell below the collection