मुंबई विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर

file photo
file photo

मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालये आदर्श प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका पुरस्कार जाहीर केले आहेत.

शैक्षणिक वर्ष 2018-19 साठीचा ग्रामीण भागातून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार बी. एन. एन. महाविद्यालय भिवंडी, वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे आणि जे. एस. एम. महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला; तर शहरी भागातून के. जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नोलॉजी सायन आणि ठाकूर महाविद्यालय ऑफ सायन्स आणि कॉमर्स कांदिवली यांना उत्कृष्ट महाविद्यालयाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

हेही वाचा : शिवसेना विसरली `आरेला का रे`?

या वर्षीपासून विद्यापीठाने नव्याने सुरुवात केलेले आदर्श प्राचार्य पुरस्कारही प्रदान करण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातून महात्मा फुले महाविद्यालय पनवेलचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर आणि मालाड येथील डी.टी.एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर कुऱ्हाडे यांना आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा : रडण्याचा आवाज आला म्हणून ते चेंबरकडे धावले...

या वर्षीचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार डॉ. मनीषा भिंगारदिवे, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांना प्रदान करण्यात आला; तर गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने शहरी विभागासाठी डीएव्ही महाविद्यालय भांडुपचे नंदकिशोर पाटील, मिठीबाई महाविद्यालयाचे प्रयोगशाळा सहायक समीर मेहता यांना सन्मानित करण्यात आले. 

विद्यार्थ्यांना पारितोषिक 
ग्रामीण विभागातून रावराणे महाविद्यालय वैभववाडीचे अधीक्षक संजय रावराणे, विसपुते शिक्षण महाविद्यालय पनवेलच्या मुख्य लिपिक परिमला कारंजकर यांचा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील आणि वित्त व लेखा अधिकारी माधवी इंगोले यांच्या हस्ते या सर्व पुरस्कार विजेत्यांना सन्मानचिन्ह, धनादेश व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वर्षीच्या लघुसंशोधन प्रकल्पासाठी फादर कांसीकाओ रॉड्रीक्‍स तंत्रज्ञान संस्था वाशी येथील कविता शेळके, श्रेयस लाभसेटवार, संजना प्रधान, सोमैया हरिदास या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com