मुंबई विद्यापीठाच्या सहा अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठामार्फत डिसेंबर 2017 आणि जानेवारी 2018 मध्ये घेण्यात आलेल्या सहा अभ्यासक्रमांचे निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

मुंबई - मुंबई विद्यापीठामार्फत डिसेंबर 2017 आणि जानेवारी 2018 मध्ये घेण्यात आलेल्या सहा अभ्यासक्रमांचे निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

या निकालामध्ये एमएससी पार्ट दोनच्या सेमिस्टर तीनचा सीबीसीजीएस पद्धतीनुसार घेतलेल्या परीक्षेचा समावेश आहे. एमएफएमचा दुसऱ्या वर्षाचा सेमिस्टर एक रिव्हाईज अभ्यासक्रमाच्या सीबीएसजीएस पद्धतीने घेतलेली परीक्षा आणि सीबीएसजीएसनुसार घेतलेल्या एमएमएम अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचा सेमिस्टर 1 चा रिव्हाईज विषयाचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. तर एमएससी पार्ट टू सेमिस्टर तीन, एमकॉम पार्ट 1, एमकॉम पार्ट 2 या अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाची प्रतीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने अखेर दिलासा दिला आहे. 

Web Title: Mumbai University announced results of six courses