विद्यापीठाचा बी. कॉम. सत्र 5 चा निकाल जाहीर 

विद्यापीठाचा बी. कॉम. सत्र 5 चा निकाल जाहीर 

मुंबई - ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2018 मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बी. कॉम. सत्र 5 च्या परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाने मंगळवारी (ता. 29) मध्यरात्री www.mumresults.in या संकेतस्थळावरून जाहीर केला. 56 हजार 511 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 31 हजार 965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल 57.11 टक्के लागला. दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षांपैकी 103 परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर करण्यात आले आहेत. 

तृतीय वर्ष बी. कॉम.च्या चार विषयांच्या 2 लाख 25 हजार 223 उत्तरपत्रिका तपासणीसाठी आल्या होत्या. या उत्तरपत्रिका 4 हजार 116 शिक्षकांनी तपासल्या. सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीने झाले. 56 हजारांपेक्षा जास्त आसन क्रमांक असल्याने आसन क्रमांकानुसार स्वतंत्र फायली करून त्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर निकाल पाहणे सोपे जाईल. यासाठी सर्व्हरची क्षमताही वाढविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यांतील; तसेच राज्याबाहेरील सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातील एक परीक्षा केंद्र अशा 236 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. 

बी.कॉम.ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्या मोठी असल्याने निकाल अचूक व निर्दोष लावण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. मूल्यांकनामध्ये तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी अनेक बाबींची दक्षता घेण्यात आली होती. 
- डॉ. विनोद प्र. पाटील, संचालक,  परीक्षा व मूल्यमापन मंडळ (मुंबई विद्यापीठ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com