विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा 

विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा 

मुंबई - मुंबई विद्यापीठाचा बहुतांश कारभार कंत्राटी कामगारांवर अवलंबून आहे; मात्र विद्यापीठ त्यांना नियमित कामगारांप्रमाणे समान वेतन देत नाही. कंत्राटी कामगारांना समान वेतन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेमार्फत शुक्रवारी (ता. 4) कलिना कॅम्पसमध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला, परंतु विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून अत्यल्प वेतनावर राबत आहेत. विद्यापीठ त्यांच्याकडून काम करून घेत असले, तरीही त्यांना नियमित कामगारांप्रमाणे समान वेतन देत नसल्याने कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही विद्यापीठ त्याची अंमलबजावणी करत नसल्याने कंत्राटी कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. 

कामगार आयुक्त, भविष्य निर्वाह अधिकारी, महिला आयोगानेही मुंबई विद्यापीठाला वारंवार नोटिसा बजावल्या आहेत. यानंतरही विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने शुक्रवारी दुपारी 1 ते दीड या वेळेत कलिना कॅम्पसमधील महात्मा ज्योतिबा फुले भवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com