विद्यापीठाचे मोबाईल ॲप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या मोबाईल ॲपचे उद्‌घाटन फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात पार पडले. मोबाईल ॲपच्या माध्यमातून विद्यार्थांना प्रवेशापासून ते परीक्षा प्रवेश पत्रापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सहा लाख विद्यार्थी आणि ७९१ महाविद्यालयांना याचा लाभ होणार आहे.

अँड्रॉईड मोबाईल वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेस्टोअरमधून हे ॲप Mum e-Suvidha या नावाने डाऊनलोड करता येईल. विद्यार्थांना विद्यापीठाने दिलेला पीआरएन हा १६ अंकी क्रमांक त्याचा युजर आयडी असेल; तर पासवर्ड महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. 

मोबाईल ॲपमधून महाविद्यालय व विद्यार्थ्यांना प्रवेश व परीक्षेसंदर्भात विविध सुविधा उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक, हॉलतिकीट अशा सुविधा मिळणार आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयेही विद्यार्थ्यांसाठी विविध सूचना या ॲपमार्फत पाठवू शकणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठही महाविद्यालयांना या ॲपमार्फत सूचना पाठवणार आहे.

कलिनामध्ये लवकरच नक्‍युबेशन केंद्र
१ सध्या संशोधन व नवोपक्रमामध्ये स्थानिक व जागतिक गरज पाहणे महत्त्वाचे आहे. यामध्ये आंतरशाखीय दृष्टिकोन, उद्योग     व शैक्षणिक सहकार्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य या माध्यमातून   
 संशोधन व विकास करणे गरजेचे आहे. 
२ याकरिता विद्यापीठाच्या विद्यानगरी कॅम्पसमध्ये लवकरच नक्‍युबेशन केंद्र स्थापन करण्यात येणार  असल्याचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी  सांगितले. 
३ विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनीही संशोधनासाठी नक्‍युबेशन केंद्र स्थापन करावे, असे आवाहनही त्यांनी  केले आहे.

केरळच्या पूरग्रस्तांना मदत निधी
मुंबई विद्यापीठातील सर्व विभागप्रमुखांनी एक दिवसाचा पगार केरळच्या पूरग्रस्तांना देण्याचे मान्य केले आहे.

Web Title: Mumbai University of Mobile App