अपात्र कुलसचिव नेमल्यास आंदोलन!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

मुंबई - मुंबई विद्यापीठातील कुलसचिव आणि परीक्षा व पुनर्मूल्यांकन संचालक यासह विविध पदांचा कार्यभार प्रभारी व्यक्तींकडे सोपविण्यात आला आहे. ही पदे भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नुकत्याच अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ही निवड प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि नियुक्त उमेदवाराचा भ्रष्टाचार व गैरप्रकाराशी संबंध नसावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कुलगुरूंकडे केली आहे. या पदांवर गैरप्रकाराचे आरोप असलेल्या व्यक्तीची निवड झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन मनविसेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष ॲड्‌.

मुंबई - मुंबई विद्यापीठातील कुलसचिव आणि परीक्षा व पुनर्मूल्यांकन संचालक यासह विविध पदांचा कार्यभार प्रभारी व्यक्तींकडे सोपविण्यात आला आहे. ही पदे भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नुकत्याच अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ही निवड प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि नियुक्त उमेदवाराचा भ्रष्टाचार व गैरप्रकाराशी संबंध नसावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कुलगुरूंकडे केली आहे. या पदांवर गैरप्रकाराचे आरोप असलेल्या व्यक्तीची निवड झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन मनविसेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष ॲड्‌. संतोष धोत्रे, राज्य उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे, विद्यापीठ उपाध्यक्ष अभिजित भोसले यांनी कुलगुरूंना दिले आहे. 

मुंबई विद्यापीठाने ही पदे भरण्यासाठी जाहिरातीद्वारे पात्र व्यक्तींकडून अर्ज मांगवले होते. त्यामधून अंतिम उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. 

Web Title: mumbai university selection process should be transparent