कुलगुरूंच्या नावाची आज घोषणा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीच्या अंतिम पाच उमेदवारांची राज्यपाल सी. विद्यासागर राव उद्या (ता. 19) मुलाखत घेणार आहेत. त्यानंतर या पदावर कोणाची निवड होईल, ही अनेक आठवड्यांची उत्सुकताही संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे.

कुलगुरुपदाच्या उमेदवारांच्या अंतिम यादीत नागपूर महाविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, रुईया महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुहास पेडणेकर, मुंबई विभागाच्या जर्मन विभागाच्या प्रमुख डॉ. विभा सुराणा आणि अन्य दोन सदस्यांच्या उद्या मुलाखती होणार आहेत. राज्यपाल भवनातून अद्यापही या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. अंतिम 32 उमेदवारांतून कुलगुरूसाठी नियुक्त कस्तुरीरंगन शोध समितीने या पाच उमेदवारांची निवड केली आहे.

Web Title: mumbai university vice chancellor announcing