मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रांची स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड अप्लाइड सायन्स म्हणूून ओळखण

uni-mumb.jpg
uni-mumb.jpg

मुबंई : मुंबई विद्यापीठाचे कल्याण येथील उपकेंद्र 'स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अॅँन्ड अप्लाईड सायन्सेस' म्हणून ओळखले जाणार आहे. विद्या परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या उपकेंद्रात 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.

नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमा बरोबरच औद्योगिक गरजा लक्षात घेत मुंबई विद्यापीठाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. अभियांत्रिकीच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमाबरोबरच या उपकेंद्रात पीएचडीचे संशोधन केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. 'एम.टेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग', 'केमिकल इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी', 'ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग', 'आर्टिफिशिअल इंटेलिजेंस' याबरोबरच 'एमएस्सी इन ओशिनोग्राफी' हे पदव्युत्तर अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहेत.  'कॅम्प्युटर इंजिनिअरिंग', 'केमिकल इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी' आणि 'ओशिनोग्राफी' या विषयांसाठी पीएचडीचे संशोधन केंद्रही येथे सुरु करण्यात येणार आहे.

बदलत्या काळानुसार औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या गरजांना लक्षात ठेऊन त्या दिशने विद्यार्थ्यांना अधिकाअधिक रोजगाराक्षम अभ्यासक्रम देण्यासाठी विद्यापीठाने येथे या अभ्यासक्रमांची सुरुवात करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी विद्यापीठात सलंग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयां व्यतिरिक्त अभियांत्रिकीचे शिक्षण देणारी संस्था कार्यान्वित नसल्याने विद्यापीठाच्या कल्याण येथील 'स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाईड सायन्सेस'मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण आणि संशोधन देणारी भविष्यातील सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी विद्यापीठाने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. यामार्फत चालविण्यात येणारे अभ्यासक्रम हे आजच्या काळातील प्रगत संगणक ज्ञानाबरोबर 'कॅम्प्यूटर इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनियरिंग क्षेत्रातील प्रगत ज्ञानाने विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचा दृष्टिकोन ठेऊन तयार करण्यात आले आहेत.

बदलत्या गरजांना अनुसरून संगणक आर्किटेक्चरमध्ये सुधारणा, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अल्गोरिदम आणि डेटा व्यवस्थापन तंत्रांचे एकत्रीकरण आणि रासायनिक प्रक्रियेच्या 'सिम्युलेशन'साठी आवश्यक असलेल्या रासायनिक प्रक्रिया आणि सॉफ्टवेअर साधनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता वाढल्याने,  त्याचबरोबर झपाट्याने विकसीत होणारे 'आर्टिफिशिअल इंटेलिजेंस', 'क्लाऊड कम्प्युटिंग', 'मशिन लर्निंग', 'बिग डेटा', 'इमेज प्रोसेसिंग', 'प्रगत ऑपरेटिंग सिस्टीम्स', 'एम्बेडेड सिस्टम डिझाइन' अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण अद्ययावत क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी विद्यापीठाने या अभ्यासक्रमांची निवड केली आहे.

रेल्वे, रस्ते, सागरी आणि हवाई क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेत या क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी 'ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरींग' क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यानिमित्ताने विद्यापीठाने या अभ्यासक्रमाची निवड केली आहे. तसेच ७२० किमीचा लाभलेला विस्तीर्ण समुद्र किनारा आणि या क्षेत्रातील वाढत्या रोजगाराच्या संधी सोबतच नव्याने सागरी संशोधनाची गरज लक्षात ठेऊन विद्यापीठामार्फत 'एमएस्सी ओशिनोग्राफी' हा अभ्यासक्रम याठिकाणी सुरू केला जाणार आहे. त्याचबरोबर 'कॅम्प्युटर इंजिनिअरिंग', 'केमिकल इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी' आणि 'ओशिनोग्राफी' या क्षेत्रातील संशोधनासाठी पीएचडीचे अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार असून त्यासाठी विद्यापीठामार्फत लवकरच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात परिपत्रक निर्गमित केले जाणार आहे.

'' 'आर्टिफिशिअल इंटेलिजेंस', 'क्लाऊड कम्प्युटिंग', मशिन 'लर्निंग', 'बिग डेटा', 'इमेज प्रोसेसिंग', 'सागरी संशोधन' आणि वाहतूक क्षेत्रातील भविष्यकालीन औद्योगिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाला प्रशिक्षित करून प्रगत ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठाने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाइड सायन्स' कल्याण येथे अभियांत्रिकीचे  संशोधन करणारी सक्षम यंत्रणा यानिमित्ताने तयार होणार आहे.''
- प्रा सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com